लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 11 मार्च 2018
उमद्या व्यक्तीमत्वाचा स्मार्ट महाविद्यालयीन तरुण शरठ राव बुडाल्याच्या भीतीनं सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे...
कोर्टी, ता. पंढरपूर येथील सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालयाचा एक विद्यार्थी शेततळ्यात पोहताना बुडाला असून त्याला शोधण्याचे कार्य पंढरपूर तालुका पोलिसांनी हाती घेतले आहे. अंधारामुळे व तलावाची खोली 30-ते 35 फुट असल्यामुळे शोधकार्यात अडथळा येत असल्याची माहिती पोलिसांकडून समजते.
याबाबत पंढरपूर तालुका पोलिसांकडून समजलेली प्राथमिक माहिती अशी की, शरठ शशिधर राव (वय-20), रा. दत्त नगर, इंदापूर हा विद्यार्थी महाविद्यालयातील आपल्या इतर 8 विद्यार्थी मित्रांसोबत जैनवाडी, ता.पंढरपूर येथील एका शेतकर्याच्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. ही सर्व मित्रमंडळी दुपारी 3 वाजता पोहण्यासाठी या शेततळ्यात उतरले. साडे चार वाजण्याच्या सुमारास सर्वजण तळ्यातून बाहेर आले. परंतु यावेळी शरठ हा वर आला नसल्याचे सर्वांच्या लक्षात आले. शरठ पाण्यात बुडाल्याच्या भीतीने सर्वजण घाबरले. त्याचे कपडे व मोबाईल तळ्याच्या काठावर असल्याचे दिसून आले. तात्काळ शरठच्या आई-वडील व नातेवाईकांना याबाबत कळविण्यात आले. पंढरपूर तालुका पोलिसांना ही माहिती समजताच पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के.के. खराडे यांनी तात्काळ घटनास्थळी पोलिसांचे पथक पाठविले असून शरठ ला शोधण्याचे कार्य सुरु असल्याचे समजते.
शरठ हा सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरगिच्या दुसर्या वर्षात शिक्षण घेत असल्याचे समजते. शरठचे आई-वडील व नातेवाईक घटनास्थळी आले असून त्यांचा आक्रोश पाहून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शरठला पोहता येत नव्हतं परंतु तो एका तारेला धरुन पोहण्याचा प्रयत्न करत होता. अशी माहिती पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के. के. खराडे यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments