लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
कन्या प्रशालेत स्मृती दिना निमित्त आयोजित स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न
*कै.वामनराव शिंदे साहेब यांचे शिक्षण क्षेत्राबरोबर उद्योजक तयार करण्याचे कार्य आदर्शवत-बाबुराव गायकवाड
*कै.वामनराव शिंदे साहेब यांचे शिक्षण क्षेत्राबरोबर उद्योजक तयार करण्याचे कार्य आदर्शवत-बाबुराव गायकवाड
पंढरपूर LIVE 11 मार्च 2018
पंढरपूर ः पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींनी महिला वर्गाच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यास सुरूवात केली असून त्या योजनांचा लाभ घेत महिलांनी सर्वांगिणदृष्ट्या सक्षम व्हावे. आता हीच काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पाखरं संकुलच्या कार्यवाह श्रीमती शुभांगीताई बुवा यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या पंढरपूर युवती प्रमुख सौ. देवयानी दामोदरे यांनी आयोजित केलेल्या महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणार्या महिलांच्या सन्मानसोहळ्या प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा मा. सौ. नंदिनीताई चौगुले होत्या.
यावेळी बोलताना श्रीमती बुवा पुढे म्हणाल्या की, भाजपा सरकारने खास महिला वर्गासाठी अनेक चांगल्या योजना तयार केल्या आहेत. त्या ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणेआवश्यक आहे. पंढरपूरात युवती संघटनेद्वारे खूप चांगले काम साकारले जात आहे आणि याचे श्रेय युवती प्रमुख सौ. देवयानी दामोदरे यांना जाते. पक्षाने त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी त्या अत्यंत प्रामाणिकपणे आणि विश्वासाने पार पाडत आहेत.यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ. सौ. शिल्पा गडम यांनी उपस्थित महिलांनाआरोग्यविषयक सविस्तर मार्गदर्शन केले. विशेषत: कॅन्सर या विषयावर त्यांनी केलेल्या विवेचनामुळे अनेक नवीन माहिती मिळाली.
कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी श्रीमती कमलताई शेंबडे, डॉ. शिल्पा गडम, मायाताई सांगोलकर, आनंदीताई पवार, सरस्वतीताई मोहिते आदी महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास श्रीमती शकुंतलाताई नडगिरे, सौ. सुप्रिया वाईकर, सौ. रेखा कुलकर्णी आदींसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्रमुख सुरैय्या पिरजादे, सुजाता लोंढे, स्पृहा गुर्जर, कांचन काकडे, आशा गुंडेवार, सोनाली गायकवाड, अनिता पाटील, प्रज्ञा बारसकर, अनिता कांबळे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. अनिता पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
महिला दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना शुभांगीताई बुवा, कमल शेंबडे, शकुंतला नडगिरे, डॉ. शिल्पा गडम, युवती प्रमुख देवयानी दामोदरे, उपप्रमुख सुयैया पिरजादे व कार्यकारिणी सदस्या.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments