आमदार प्रशांतराव परिचारक यांनी शहरातील विविध विकास कामाची केली पाहणी

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 11 मार्च 2018

              शहरामध्ये नगरपरिषदेच्या वतीने व सार्व.बांधकाम विभागाच्यावतीने तिर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत या चालू  असलेल्या कामाची आमदार प्रशांतराव परिचारक यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, नगरसेवक वामन बंदपट्टे, संजय निंबाळकर, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, उपनगराध्यक्ष विशाल मलपे, पक्षनेते अनिल अंभगराव, गुरुदास अभ्यंकर, माजी पक्षनेते सचिन डांगे, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, पाणीपुरवठा अभियंता ए.बी.जाधव, अमोल डोके, बसवेश्वर देवमारे, नवनाथ रानगट, माजी नगराध्यक्ष पांडुरंग घंटी यांच्या समवेत या कामाची पाहणी केली.
          पर्यटक निवास ते साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे चौक ते मध्यप्रदेश भवन येथे चालू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली तसेच महात्मा ज्योतिबा फुले चौक ते गोपाळपूर पुल या रस्त्यांची कामाची पाहणी करुन या रस्त्यालगत असलेल्या लेडकीनाला (भदभदी) येथे पाणी साठूण नागरिकांना त्रास होत असल्याबाबत तक्रारी येत होत्या याची दखल घेऊन नगरपरिषदेने सुमारे ७५ लाख खर्च करुन सदरची मोठी गटार बंद करुन त्याठिकाणी मोठ्या सिमेंटच्या पाईप टाकाण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाची सुध्दा आमदार प्रशांतराव परिचारक यांनी पाहणी करुन सदरचे काम चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर करावे आशा सुचना दिल्या तसेच सांगोला रोड परिसर व इसबावी भागातील नागरिकांच्या सोईसाठी १० लाख लिटरच्या पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत. सांगोला रोड परिसरातील येथील राहणा-या नागरिकांची पाण्याची सोय व्हावी यशोधननगर मधील जागेमध्ये १० लाख लिटर पाण्याची टाकी तसेच इसबावी भागासाठी विसावा मंदिर उत्तर बाजुस असलेल्या जागेत बांधण्यात येणा-या जागेची पाहणी केली. तसेच गुरुदेव नगर,भगवाननगर, या भागात पाणी साचू नये यासाठी तारेमळ्या लगत असलेल्या नाल्यामधील गाळ काढुन साठलेले पाणी त्वरित काढुन देण्याबाबतच्या सुचना यावेळी आमदार प्रशातराव परिचारक यांनी दिल्या.
आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या माध्यमातून या दोन्ही पाण्याच्या टाकीसाठी शासनाकडुन विधी उपलब्ध झाला असून या होणा-या पाण्याच्या टाकीमुळे सांगोला रोडवरील व इसबावी येथील विसावा मंदिर उत्तर बाजुस असलेल्या हजारो नागरिकांना याचा लाभ होणार असून त्यांची पिण्याच्या पाण्याची समस्या कायम स्वरुपी सुटणार आहे.- नगराध्यक्षा साधनाताई भोसले 





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments