लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 11 मार्च 2018
निलेश चाळक बीड:-तालुक्यातील ढाकेफळ येथे दहावीची परीक्षा देत असलेल्या अल्पवयीन मुलीचा एकतर्फी प्रेम प्रकरणातून गळा आवळून खून केला तर २५ वर्षीय प्रियकरानेही बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तिवला जात आहे. शुक्रवारी रात्री अकरा ते साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे.
सुनिता चटप ही इयत्ता दहावीत शिकत होती. गावातीलच गणेश थोरात व सुनीताचे प्रेमसंबंध होते. असे असताना दोन दिवसांपूर्वीच सुनिताला लग्नासाठी स्थळ आले होते. त्यामुळे गणेश थोरात अस्वस्थ झाला होता. शिवाय गणेशने आपली प्रेमकहाणी सुनीताच्या पालकांना शुक्रवारी रात्री फोनवरून सांगून लग्नाची मागणी घातली होती. मात्र सखाराम थोरात यांचे वडील सुर्यभान थोरात यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने त्यांचा पुर्ण विधी झाल्यावर लग्नाचे बघू असे गणेशच्या वडिलांनी त्यास सांगितले होते. मात्र आपल्या लग्नासाठी विरोधच होत आहे अशी समज गणेशची झाली होती. शुक्रवारी रात्री सखाराम थोरात यांच्या घरी भजनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात सुनिताचे आई-वडीलही गेले होते.
यावेळी सुनिता ही तिच्या अपंग भावासह घरातच होती. याचा फायदा घेत आरोपीने सुनिताला जवळपास हजार ते दीड हजार फुट अंतरावरील कापसाच्या शेतात ओढून नेले. त्यानंतर तिचा खून केला व नंतर घटनास्थळापासून जवळच्याच बोरीच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. एस. वाघमारे, चाफळे पोलीस नाईक वाले, शिंदे, नाईक, यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला.
सुनितास फोन द्या ......या घटनेपूर्वी गणेश थोरात याने सुनिताचे वडील दिगंबर चटप यांच्या मोबाईलवर तीन ते चार वेळा फोन केला होता. यावेळी त्याने सुनितासोबत बोलायचे आहे तिला फोन द्या असे म्हटले. मात्र, सुनिताच्या वडिलांनी पुन्हा फोन करुन नकोस, असे सांगत फोन कट केला होता.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments