लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 11 मार्च 2018
निलेश चाळक बीड: जिल्ह्यातील चिंचगव्हाण येथील विवाहितेस पेटवून दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना दि. ७ मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी जाळीत महिलेचा पती, सासरा, दोन दीर जाऊ यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला
याबाबत अधिक माहिती अशी कि, गेवराई येथील शिवाजी सुगडे यांची कन्या राधिका हिचा विवाह २००५ साली माजलगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथील गजानन विठ्ठल गुळकर याच्यासोबत झाला होता. परंतु, लग्नानंतर काही दिवसातच सासरचे लोक त्रास देऊन लागल्याने राधिकाने त्यांच्यावर न्यायालयात केस दाखल केली होती. त्यानंतर सासरचे लोक तिला पुन्हा घेऊन गेले. दि. ७ मार्च रोजी सकाळच्या सुमारास राधिकाचा पती गजानन, सासरा विठ्ठल गुळकर, दोन दीर आणि जाऊ यांनी तिला रॉकेल ओतून पेटवून दिले आणि घराला बाहेरून कडी लावून पळून गेले. यात राधिका टक्के भाजली. बीडच्या जिल्हा रुग्णालयात रात्री ८.५५ वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असे तिचा संभाजी शिवाजी सुगडे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पाचही आरोपींवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments