डॉ. पतंगराव कदम यांना कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 11 मार्च 2018


पंढरपूर: येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील
महाविद्यालयाच्या वतीने डॉ. पतंगराव कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली
वाहण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य सीताराम गोसावी यांनी श्रद्धांजली
अर्पण करते वेळी ‘ त्यांनी शालेय शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या कमवा व
शिकवा या योजने अंतर्गत पूर्ण केले होते. त्यांना रयत शिक्षण संस्थे विषयी
नितांत प्रेम होते. मॅनेजिंग कौन्सिल सदस्य म्हणून त्यांनी काम पहिले आहे. ते
मनमिळावू , कृतीशील, अतिशय दिलदार, हासरे मिस्कील वृत्तीचे असे अनेक
गुणांनी युक्त व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या आकस्मित जाण्याने राजकीय, सामाजिक,
शैक्षणिक क्षेत्राची आणि रयत शिक्षण संस्थेची मोठी हानी झाली आहे.’ असे
उदगार काढले. यावेळी कला विभागाचे उपप्राचार्य बी. जे. तोडकरी वाणिज्य
विभागाचे उपप्राचार्य एन. एन. तंटक, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. जे.
एस. पाटील, महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षेकेतर सेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी
उपस्थित होते.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments