लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 1 मार्च 2018

पंढरपूर ः  - पंढरपूर तालुक्यातील प्रतिष्ठ्येच्या गुरसाळे ग्रामपंचायतीवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके गटाने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक                                श्री मोहनआण्णा कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली 15 पैकी 9 जागा व सरपंच पद जिंकत बाजी मारली आहे. विरोधी आघाडीला 6 जागांवरच समाधान मानावे लागले.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामुळे कायम चर्चेत राहणार्‍या गुरसाळे ग्रामपंचायतीसाठी मंगळवार दि.27.02.2018 रोजी अत्यंत चुरशीने मतदान होऊन आज दि.28.02.2018 रोजी त्याचा निकाल जाहीर झाला.
पंढरपूर तालुक्यातील प्रतिष्ठ्येच्या गुरसाळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आमदार श्री भारत भालके गटाच्या सौ.संगीता किसन कोळेकर या 1760 अशा भरघोस मतांनी विजयी झाल्या.
अखेर आमदार श्री भालके गटाचे कट्टर समर्थक श्री मोहनआण्णा कोळेकर यांनी 30 वर्षे सत्ता असलेली गुरसाळे ग्रामपंचायत पुन्हा एकदा आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले.




पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे