लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 1 मार्च 2018
पंढरपूरमध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या 51 व्या वाढदिवसानिमीत्त पंढरीतील दत्त घाट व महाद्वार घाट येथे 200 लोकांना अन्नदान करण्यात आले. तसेच दि.25 फेब्रुवारीला रक्तदान शिबीर संपन्न झाले. या शिबीरास तरूण वर्गाचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबीराचे उद्घाटन पंढरपुचे वीर सुपूत्र शहीद मेजर कुणालगीर गोसावी यांचे वीरपिता मुन्नागीर गोसावी यांच्या शुभहस्ते झाले. त्याप्रसंगी मोहोळ तालुक्याचे शिवसेना युवा नेते चरणराज चवरे, माळशिरस तालुका युवा सेना प्रमुख स्वप्नीलमाने - देशमुख , एनआयआयटी कॉम्प्युटर इन्स्टिट्युटचे शाम गोगाव सर, माजी सैनिक व सैनिक सहकारी बँकेचे विद्यमान व्हा.चेअरमन नाईक साहेबलाल मुजावर व ईर्शाद मुजावर आदी उपस्थित होते.
या रक्तदान शिबीरास प्रणव बाडगंडी, अभिजित कोळी, शोएब शेख, अरबाज मुलाणी, सज्जू शेख, शेखर भोसले आदींचे विशेष सहकार्य लाभले. छत्रपती उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त्त सदर सामाजिक उपक्रम राबवताना विशेष आनंद झाला. यावेळी छत्रपती उदयनराजेेंना रयतेच्या कल्याणासाठी उदंड आयुष्य लाभावे. अशी प्रार्थना केल्याची माहिती संयोजक ईर्शाद मुजावर यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com










0 Comments