लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 1 मार्च 2018
पंढरपूर: दि. २७ : ‘जगण्यातील आनंद वाचण्यात असतो. म्हणून खूप वाचन
करणे आवश्यक आहे. भाषेतून माणसाच्या स्वभावाचे दर्शन घडते, त्याची उंची
कळते. पालक,विद्यार्थी ,शिक्षक व शासन यांच्या प्रयत्नातूनच मराठी समृध्द
होईल. यासाठी शिक्षण बोलीभाषेतून घेतले पाहिजे. भाषेविषयीचा
संकोचितपणा बाजूला ठेवला पाहिजे. आपल्या भाषेचा अभिमान बाळगत
असताना दुसऱ्या भाषांचा सन्मान सुध्दा करता आला पाहिजे, हाच मराठीचा
संस्कार आहे. साहित्य माणसाला जगायला शिकविते. आपला मराठीकडे
बघण्याचा दृष्टीकोन व्यापक असायला हवा. मराठी जिवंत ठेवण्याचे काम फक्त
आपणच करू शकतो ते आपण आपल्या रोजच्या कृतीतून करायला हवे’. असे
प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूरचे प्राचार्य सीताराम
गोसावी यांनी केले.
पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील
महाविद्यालयाच्या वतीने मराठी विभागात आयोजित केलेल्या ‘मराठी भाषा
गौरव दिन व कुसुमाग्रज जयंती समारंभा’च्या निमित्ताने अध्यक्षस्थानावरून ते
बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य
एन. एन. तंटक, मराठी विभाग प्रमुख डॉ. चांगदेव कांबळे प्रा. देवानंद सोनटक्के
प्रा. डॉ. राजाराम राठोड. प्रा. सुभाष कदम, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. चांगदेव कांबळे
यांनी करून दिला. यावेळी डॉ चांगदेव कांबळे यांनी प्रास्ताविकात मराठी भाषा
आणि संस्कृती समृध्द करण्यामध्ये कुसुमाग्राजानी दिलेल्या योनादानाचा आढावा
घेतला. . यावेळी प्रा. देवानंद सोनटक्के प्रा. डॉ. राजाराम राठोड. प्रा. सुभाष
कदम, कु. शबरी गानमोटे, प्रांजली भट, विकास माने, बालाजी शिंदे, निकिता
कदम, सुजाता कानडे, दत्ता कोळी यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
सूत्रसंचालन गणेश गायकवाड यांनी केले. आभार प्रवीण भाकरे यांनी मानले.
यावेळी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
मराठी भाषा गौरव सप्ताहात ‘ग्रामीण बोली भाषेतील म्हणींचा वापर’ या
विषयावर डॉ. चांगदेव कांबळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. ‘मराठी
शब्द भंडार व नवीन पर्यायी शब्द निर्मिती’ स्पर्धा आयोजित करण्यात आली
होती. त्यात ननवरे जगदीश मोहन (प्रथम), खंदारे अशोक दत्तात्रय व भट
प्रांजली लक्ष्मण (द्वितीय), जाधव सोनाली बाळू (तृतीय) या विद्यार्थ्यांनी
प्राविण्य संपादन केले. ‘मोडी लिपीतील मराठी साहित्य आणि भाषा संवर्धन’ या
विषयावर प्रा. बाळकृष्ण माळी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com



0 Comments