लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 1 मार्च 2018

            निलेश चाळक बीड:-  बेकायदा कामाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. अशाने विकास होण्याऐवजी तो खुंटत आहे. त्यातच बायको पदाधिकारी असताना पती आणि आई पदाधिकारी असताना मुलगा त्यांच्या सरकारी कार्यालयात बसून कारभार हाकत असल्याचे दिसत आहे. असे प्रकार चक्क अधिकाऱ्यांसमोर होताना अधिकारी जाणीव पूर्वक डोळेझाक करीत असल्याने अशा लोकांना संबंधित महिला सदस्य, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसह जेल मध्ये डांबण्याची मागणी जन आंदोलनाचे विश्वस्त अ‍ॅड. अजित एम. देशमुख यांनी केली आहे.
            असा प्रकार कोणत्याही कार्यालयात होत असेल तर जनतेने याची व्हिडिओ शुटींग करू त्यांची तक्रार करावी. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत सह नगर परिषदांमध्येही असे प्रकार घडत आहेत. एकीकडे महिला सक्षमीकरण, बचत गट आणि अन्य कार्यक्रमात हे लोक आदर्शच्या गप्पा मारतात. मात्र महिलांना घटनेने दिलेल्या अधिकारावर घाला घालत स्वतः कारभार हाकतात. ही घटनेने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली आहे.
             विशेष म्हणजे हे लोक असे कृत्य करीत असताना भ्रष्ट अधिकारी आपल्या डोळ्याने ते पाहतात. कारण ते भ्रष्ट असल्याने असे प्रकार रोखायला त्यांची नैतिकता त्यांना साथ देत नाही. त्यामुळे कायद्याचे पालन करायला लावण्याची जबाबदारी जनतेने हाती घेण्याची वेळ आली आहे. जनता जोपर्यंत अशा कामात पुढाकार घेत नाही, तोपर्यंत भ्रष्ट अधिकारी हे रोखायला पुढे येणार नाहीत.
             जिल्हा परिषदेमधील विविध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संबंधित जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि सदस्य यांचेकडून आणि त्यांचे नातेवाईक यांचेकडून अपमानास्पद वागणूक दिली जाते. असे शासनाच्या आल्यानंतर शासनाने दि. १७ जुलै २००७ रोजी शासन परिपत्रक काढून याबाबत कार्यालयांमध्ये आचारसंहिता लागू केली आहे. मात्र अधिकाऱ्यांनी ही पुन्हा गुंडाळून ठेवली आहे.
            राजकारणातील स्पर्धा वाढत आहे. वाढत्या स्पर्धेत प्रत्येक राजकारणी आपला प्रभाव जनतेला दाखवण्यासाठी असे प्रकार करताना दिसतात. यामुळे पात्र आणि हुशार महिलांना त्यांची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळत नाही. अशातून त्यांचे मानसिक खच्चीकरण होते. एक तर महिला राजकारणात येत नाहीत, आणि ज्या येतात त्यांच्यापैकी अनेकांना असे रोखले जाते.
             पदाधिकाऱ्यांची कामे त्यांनी स्वतः करणे गरजेचे आहे. त्यांच्या निकट नातेवाईकांनी त्यांच्या कार्यालयीन कामामध्ये हस्तक्षेप करू नये. विशेषतः त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये मुळीच बसता कामा नये. असे आढळून आल्यास सदर पदाधिकारी याचे विरोधात महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या ( पिठासन अधिकारी ) ( गैरवर्तणुकीमुळे पदावरून दूर करणे ) नियम १९९५ नुसार पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश शासन परिपत्रकात दिले आहेत.
            ग्राम पंचायत सदस्यांनी गैरवर्तणूक केल्यास मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ३९ (१) अन्वये सरपंच, उप सरपंच आणि सदस्य कारवाईस पात्र ठरतात. असेही या शासन परिपत्रकात नमूद केले आहे. जनतेने असे प्रकार रोखण्यासाठी पुढे यावे, असे अ‍ॅड. देशमुख यांनी म्हंटले आहे.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे