अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद निवडणुक... नटराज पॅनलच्या सर्व 6 जागा निवडून येतील- प्रा.अजय दासरी

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 1 मार्च 2018


पंढरपूर ः - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यात उभा असलेले नटराज पॅनलचे सर्व 6 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्‍वास नाट्य परिषदेच्या सोलापूर महानगर शाखेचे अध्यक्ष प्रा.श्री अजय दासरी यांनी व्यक्त केला. 
पंढरपूर येथे आयोजित नटराज पॅनलचे उमेदवार व नाट्य परिषदेच्या पंढरपूर शाखेच्या सभासदांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी नाट्य परिषदेचे पंढरपूर शाखेचे अध्यक्ष डॉ.श्री मंदार सोनवणे, दादा साळुंखे, नाट्य अभिनेते विनय बडवे, दिलीप टोमके, नटराज पॅनलचे उमेदवार दिलीप कोरके, जयप्रकाश कुलकर्णी, आनंद खरबस, सोमेश्‍वर घाणेगांवकर, चेतनसिंह केदार, यतिराज वाकळे तसेच श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक भगिरथ भालके, सह.शिरो.कारखान्याचे संचालक सुधाकर कवडे व बाळासाहेब काळे आदींसह मोठ्या संख्येने नाट्य परिषदेचे सभासद व कलाकार उपस्थित होते.
यावेळी बोलतांना नाट्य परिषदेचे दादा साळुंखे म्हणाले की, नाट्य परिषदेच्या नियामक मंडळासाठी सोलापूर जिल्ह्यातील 8 पैकी 6 शाखांच्या प्रतिनिधींना नटराज पॅनलने उमेदवारी दिलेली आहे. यामध्ये पंढरपूर शाखेची भुमिका निर्णायक ठरणार आहे. गेल्या 5 वर्षात नियामक मंडळात निवडून गेलेले उमेदवार दिलीप कोरके यांनी अतिशय चांगले काम केलेले आहे. त्याचबरोबर नटराज पॅनलचे उमेदवार जयप्रकाश कुलकर्णी, आनंद खरबस, सोमेश्‍वर घाणेगांवकर, चेतनसिंह केदार, यतिराज वाकळे यांचे नाट्य चळवळ वाढविण्यासाठी मोठे योगदान असून हे उमेदवार नटराज पॅनलने दिलेली आहेत. त्यामुळे सर्वच उमेदवार मोठ्या मतांनी विजयी होतील. यावेळी भगिरथ भालके, सुधाकर कवडे, विनय बडवे, दिलीप टोमके, अमोल धाबळे, डॉ.मंदार सोनवणे यांनीही  आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी नाट्य परिषदेचे सदस्य दत्तात्रय जगताप, राजु उराडे, रङ्गिक शेख, विनोद शेंडगे, रविंद्र शेवडे, मुन्ना शेख, सांगोला शाखेचे प्रमुख कार्यवाहक अङ्गजल शेख, नगरसेवक प्रशांत शिंदे, निकिता पवार, जमदाडे मॅडम, नागनाथ ताटे, मंगळवेढ्याचे अश्पाक काझी, बालाजी शिंदे, रायाप्पा हळणवर, शहाजी पासले आदींसह मोठ्या संख्येने सभासद व कलाकार उपस्थित होते.
सदर प्रसंगी सुत्र संचालन श्री विक्रम बिस्कीटे सर व श्री विठ्ठल नागटिळक सर यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन श्री राजु उराडे यांनी मांडले.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments