तालुका विधी सेवा समितीच्या स्वतंत्र्य कार्यालयाचे उद्घाटन

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 1 मार्च 2018

पंढरपूर दि. 01 :-  समाजातील सर्व नागरीकांच्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे तालुका विधी सेवा समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा न्यायाधिश पी.आर.देशमुख यांच्या हस्ते आज करण्यात आले.
या कार्यालयातून सर्व पॅरालिगल व्हालंटीयर्स व संबधित विधी सेवेचे वकीलामार्फत समाजात होणा-या तडजोडीचे खटले सोडविण्यात येणार आहेत. भविष्यात कायद्याच्या माध्यमातून समाजात सुख-शांती  व सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी विधिज्ज्ञ व पॅरालिगल व्हालंटीयर्स प्रयत्न करतील अशी अपेक्षा जिल्हा न्यायाधिश पी.आर.देशमुख यांनी व्यक्त केली. तसेच नागरीकांनी विधी सेवा समितीच्या संबधी काही अडचणी असल्यास कार्यालयीन वेळेत कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हा न्यायाधिश पी.आर.देशमुख यांनी  यावेळी केले.
या उद्घाटनाप्रसंगी  जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायाधीश, अधिकारी, कर्मचारी, वकील, बार असोसिशन चे अध्यक्ष तसेच  पॅरालिगल व्हालंटीयर्स उपस्थित होते.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments