पंढरीच्या महावीर नगरमधील अपुर्ण अवस्थेतील पाण्याच्या टाकीचे कामाबाबत आमदार भारतनाना भालके यांचा विधी मंडळात तारांकीत प्रश्‍न

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 20 मार्च 2018
पंढरपूर ः दि.21 - सध्या चालू असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी पंढरपूर शहरातील महावीर नगरमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम अपूर्ण अवस्थेत असलेबाबत विधी मंडळामध्ये तारांकित प्रश्‍नाद्वारे मुद्दा उपस्थित केला. त्यावर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री यांनी लेखी उत्तरात सांगितले की, आमदार श्री भारत भालके यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची वस्तुस्थिती खरी असून सदर पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामामध्ये ङ्गार मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे त्यांनी मान्य केले.

आमदार श्री भारत भालके यांनी विधीमंडळात तारांकित प्रश्‍न क्र.110997 या मुद्याद्वारे पंढरपूर शहरातील महावीर नगर येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या 10 लक्ष लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम आजतागायत अपूर्ण अवस्थेत आहे. तसेच या पाण्याच्या टाकीच्या निर्मितीमध्ये अनियमितता होऊन निकृष्ठ दर्जाचे घटक वापरल्याबाबत पंढरपूर येथील स्थानिक नागरीकांनी प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्याचेही सांगितले व पंढरपूर नगरपालिकेने सदर पाण्याच्या टाकीचे पेस्टींग केले असता त्यामध्ये गळती व भेगा पडण्याचे निदर्शनास येऊनही शासनाने याबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्यामुळे शासन अशा भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदार यांचेवर कोणती कारवाई करणार? असे विचारले असता राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री मा.ना.श्री बबनराव लोणीकर यांनी आज दि.21.03.2018 रोजी आमदार श्री भारत भालके यांच्या प्रश्‍नाला सविस्तर लेखी उत्तर दिले आहे.
पंढरपूर शहरातील महावीर नगर येथील पिण्याच्या पाण्याच्या गैरव्यवहारामध्ये स्थानिक नागरीकांनी तक्रारी केलेल्या आहेत. सदर पाण्याच्या टाकीचे गिलाव्याचे काम अपूर्ण असून टाकीच्या आतील गिलाव्याचेही काम अपूर्ण असल्याने गळती होत असल्याचे मान्य केले. त्यामुळे सध्या पंढरपूर शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून शहरामध्ये एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. याचा नागरीकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. 
यामुळे शासनाने महावीरनगर,पंढरपूर येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम तातडीने पूर्ण करून नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी दिलासा देऊन याबाबत शासन कोणती कार्यवाही करणार ते पाहणे उत्सुकतेचे ठरेल. तसेच आमदार श्री भारत भालके यांनी स्थानिक नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न विधी मंडळामध्ये उपस्थित करून जनतेला न्याय देण्याची भूमिका शासन दरबारी लावून धरल्यामुळे आमदार श्री भारत भालके यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.












पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments