पंढरपूर लाईव्हच्या सर्व वाचकांना व जाहिरातदार बंधु-भगिणींना गुढी पाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
काही समाजकांकडून अफवा पसरवून पंढरपूरकरांमध्ये दहशत निर्माण करण्याचे कुट कारस्थान ..
आठ वाजताच व्यापाऱ्यांनी बंद केली दुकाने!
पंढरीत कुठंही काहीही घडलं नाही.. अफवांवर विश्वास ठेवु नका! पंढरपूर पोलिसांचं आवाहन!
अफवा पसरल्यानंतर चप्पल लाईनची दुकाने आठ वाजताच बंद झाली.
पंढरपूर LIVE 20 मार्च 2018
पंढरपूर शहरात अमुक भागात, अमुक चौकात दगडफेक झालीय, अमुक ठिकाणी खुन झालाय वगैरेंसारख्या अफवा पसरवून पंढरपूरकरांमध्ये दहशत निर्माण करण्याचे कुट कारस्थान कांही समाजकंटकांकडून रचले जातेय. आज रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास अशाच प्रकारच्या अफवा अशा समाजकंटकांकडून पसरवल्या गेल्या. त्यामुळे पंढरीतील व्यापाऱ्यांनी आठ वाजताच आपली दुकाने बंद केली.
अर्बन बँकेजवळ दगडफेक झालीय... कालिका देवी चौकात मारामारी झालीय.. नवीन स्टँडवर खुन झालाय अशा अफवा पसरवल्या गेल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत पंढरपूर लाईव्ह ला माहिती समजताच सबंधीत ठिकाणी पंढरपूर लाईव्ह चं संपादक भगवान वानखेडे यांनी स्वतः पाहणी करून चौकशी केली. पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्याशीही याबाबत चर्चा केली असता. या सर्व अफवा असल्याचे निदर्शनास आले.
पंढरीतील नागरिक व व्यापारी बांधवांनी अशा अफवांवर विश्वास ठेवु नये. आपापली दुकाने उघडावीत. आपापले व्यवहार सुरळीत सुरू ठेवावेत. असे आवाहन पोलिस निरीक्षक दबडे यांनी पोलीस व्हॅनमध्ये पंढरीतील विविध भागात फिरून ध्वनी क्षेपकाद्वारे केल्यानंतर काही व्यापाऱ्यांनी पुन्हा आपली दुकाने उघडली आहेत.
नागरिकांनी अफवांना बळी पडू नये हे पंढरपूर लाईव्ह कडूनही पुनःश्च आवाहन.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments