लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 20 मार्च 2018
प्रारंभी अक्कलकोट स्वामी समर्थ प्रकट दिना निमित्त विनम्र अभिवादन. आमचे मुळ ""बणजगोळ'' गाव अक्कलकोटपासून 5 कि.मी.अंतरावर असल्याने या गावात गेल्यावर कायम स्वामी समर्थांच्या कायृक्रमाचा निनाद ऐकावयास दैनंदिन मिळत असे. त्यामुळे स्वामी समर्थाविषयी असणारे स्थान मनात अढळ सदैव राहील. या गावातूनही स्वामींच्या कळसांचे नेहमी दर्शन होत असे. त्यामुळे याबाबतीत गावकऱ्यांचे मोठे भाग्य आहे.
""भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे'' हे अभयवचन आहे अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांचे ! स्वामींच्या प्रत्येक मठात हे वचन कोरलेले दिसेल. श्री स्वामी समर्थ सतत आपल्याबरोबर पाठीराखे असतात, यात तीळमात्र शंका नाही.
श्री दत्त संप्रदायातील तिसरा अवतरा म्हणजे श्री नरसिंह सरस्वती स्वामी. त्यांनी श्रीशैल पर्वतावरील कर्दळी वनात अवतार समाप्ती केल्यावर पुढे 350 वर्षानंतर एका प्रचंड वारुळातून जे प्रकट झाले तेच हे स्वामी समर्थ महाराज. श्रीनरसिंह सरस्वती हे कट्टर कर्ममार्गी होते. सोवळे, ओवळे, स्नान, संध्या इत्यादी कठोर नियम कटाक्षाने पाळणारे, धर्मपरायण होते. तर त्यांचेच अवतार श्री स्वामी समर्थ मुक्त अवधूत पंथी होते. हा मार्ग कर्ममार्गाच्या विरुध्द तत्त्वावर आधारीत होता. आपल्याला असा विचार पडतो की, नरसिंह सरस्वती स्वामींनी हा पूर्ण विरुध्द तत्वाचा विचार का पत्करला?
श्री दत्तात्रेयाचे दोन्ही अवतार (श्रीपाद श्रीवल्लभ व नरसिंह सरस्वती)कर्ममार्गाची बूज(ओळख)राखण्यासाठीच घेतले. पण चौथा अक्क्लकोट स्वामींचा अवतार हा पूर्ण निराळ्या पध्दतीचा होता व परिस्थितीनुरुप बदल घडवून आणण्यासाठीच घेतला होता. नरसिंह सरस्वतींची पध्दत धर्म तत्वाकडे जास्त होती. कर्मकांडाकडे जास्त होती. अक्कलकोट स्वामींनी तत्वज्ञान सोप्या रितीने उकलून दाखवले. धर्म, जातपात वगैरे भेदभाव कष्ट करायच्या हेतूने भक्ती व श्रध्दा यांचा विस्तार केला व समाजाची उन्नती केली. आशा, पाश, मुक्त, सदैव आनंदी वासना याग केलेला संचारी निरामय मलरद्वित मन, निरंकारी अशा पवित्र अविष्काराचे मूर्त स्वरुप म्हणजेच अवधूत अवस्था. म्हणूनच समर्थ स्वामी अवधूत रुपात प्रकट झाले.
स्वामी समर्थ ज्याकाळी प्रकट झाले, त्याकाळी मुसलमानी अंमल जावून, इंग्रजी अंमल सुरु झाला होता. हिंदू धर्म अडचणीत आला होता. त्यावेळी जनतेला सहजन सोपा मार्ग दाखवण्यासाठी स्वामी समर्थांचा अवतार झाला. स्वामी साक्षात दत्तावतार असल्याने योग विधेत प्रवीण होते. योगसामर्थ्य त्यांनी अनेकप्रकारे लीला करुन प्रकट केले. त्यामुळे लोकांची भक्तीमार्गावर श्रध्दा बसली व जनता त्यांच्याकडे आकर्षले गेली. स्वामींकडे लोक आपल्या सांसारिक अडचणी दूर करण्यासाठी येत असत. निरनिराळे शारीरिक आजार, विपन्नता वांझपणा, विविध व्याधी, सांसारिक आपत्ती यांनी त्रस्त जनता स्वामींच्या पायाशी गाऱ्हाणे मांडत असे. स्वामीही त्यांना भक्तीच्या मार्गाला लावीत व त्यांच्या तक्रारी दूर करुन समाधान देत असत.
स्वामीजी अजन्मा, सूर्याप्रमाणे तेजस्वी, सर्व अवयव सुंदर डोळ्यात अथांग करुणा, शांत, सुंदर चेहरा असे. एकेकदा मात्र भयंकर रागीत भाव, एकेकदा सात्विक असे. स्वामी कौपिनधार असत. असे हे परमसिध्द दत्तावतार सर्व हिंदूस्थान फिरुन शेवटी अक्कलकोट येथे आले. याचठिकाणी पवित्र वटवृक्षाखाली 22 वर्षे वास्तव्य केले. त्यांना कोणी प्रश्न केल्यास उत्तर असे देत-स्वामी तुम्ही कुठले? असे कुणी विचारल्यास मी समर्थ मुक्काम दत्तनगर मुळ पुरुष वडाचे झाड मुळ-मुळ असे सांगत. पुन्हा खुलासा आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण, नाच नृसिंह भान, काश्य गोत्र, मीन रास असे सांगत. जास्त विचारल्यास डोक्यावर पायपोस मारीन उठ जा, असे म्हणत. त्यांचे कान गजाननासारखे होते. कानाची पाळी हलत असे. भाषा मराठी, हिंदी. कपाळी भव्य टिळा. गळ्यात रुद्राक्ष माळ, कौपिन नेसत, जरीची टोपी घालत, कधी अंगावर शाल असे. मनात आल्यास फक्त लंगोटी घालून दिगंबर होत. वृत्ती-बालोन्मत पिशाच्च वृत्ती होती.
ध्यानधारणा, त्रिकाल स्नान, जप, तप यांचा काहीही नेम नसे. मनात येईल तसे करीत. कधी मुसलमानांच्या कबरीत जाऊ निजत, कुणाच्याही घरी अन्न घेत. आरती, पूजा करुन घेत कधी राजमहालात झोपत. त्यांची पावले मोठी होती. चाल भरधाव असे. कधी-कधी गोट्यांनी लहान मुलांसारखे खेळत. स्वामींना दुसऱ्यांच्या मनातील कळत असे. प्रश्न विचारल्यावर सरळ उत्तर देतील अगर गाणे म्हणतील. बऱ्याचवेळा ते दर्ग्यात जात. त्यांना गाय व कुत्री प्रिय होती. भगव्या रंगाची फुलांची त्यांना आवडत. भोजनात बेसनाचे लाडू, पुरणपोळी आवड तसेच कडबोळी व भाजी अत्यंत प्रिय.
स्वामी सदैव ब्रह्मानंद मम्र असत. अनुपम असे ज्ञान ब्रह्मास पिऊन तृप्त असल्याने कोणाचीही पर्वा नसे, फिकीर नसे. गर्वाने ताठ राहणाऱ्या अक्कलकोटच्या महाराजांना, मुस्काटात भडकवणारे स्वामी ""हम किसी के ताबेदार नही!'' असे स्पष्ट सांगत. त्यांनी सर्व भारतभर भ्रमण केले. शेवटी अक्कलकोटला आले व तेथेच समाधीस्थ झाले. स्वामींची अनेक नावे प्रसिध्द होती. दिगंबर, बुवा, चंचल भारती, नरसिंह भान, स्वामी समर्थ, अक्कलकोट स्वामी अशी अनेक नामे आहेत. त्यांनी धर्माधांचा गर्व नष्ट केला. कर्मकांडाचे थोतांडे करुन भोळ्या जनतेला लुबाडणाऱ्यांचे बिंग फोडले. द्वैत-अद्वैत माजवणाऱ्यांचे पित उघडे केले. पण कधीही इतर धर्मायांची निंदा केली नाही.जो यांना शरण गेला त्याला ""भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे''असे वचन दिले.
स्वामी समर्थ प्रकट दिना निमित्त महाराजांना अभिवादन. श्री स्वामी समर्थ
-प्रा.निलकंठ वामनराव शिंदे-सरकार
संस्थापक, शहीद अशोक कामटे संघटना, सांगोला.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments