सुशिक्षित बेरोजगारांनी सरकारच्या दारात ‘पकोडे’ तळायचे की मंत्रालयात घुसून आत्महत्या करायची?- प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!


पंढरपूर LIVE 20 मार्च 2018

बेरोजगारांना पकोडे तळा असे सांगणार्या सत्तांध सरकारला जनताच शिकवणार धडा-डॉ.संतोष मुंडे

हिंगोली (प्रतिनिधी)  :- सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नांवर उपाय काढण्याऐवजी युवकांनी पकोडे विकावे असे पंतप्रधान मोदी आणी अमित शाह यांनी काढलेल्या बेजबाबदार वक्तव्याचा निषेध,  सरकारने नोकरभरतीवर बंदी आणून बेरोजगारांच्या संख्येत वाढ केली आहे. या सगळ्य़ा सुशिक्षित बेरोजगारांनी सरकारच्या दारात ‘पकोडे’ तळायचे की मंत्रालयात घुसून आत्महत्या करायची याचे उत्तर मिळायला हवे  असा खडा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केला.
 हिंगोली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बेरोजगारांच्या प्रश्ननासाठी व रामलीला मैदानावरील फुटकळ व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून द्यावी तसेच विविध मागण्यासाठी विधान सभेचे गटनेते आ.अजितदादा पवार , विरोध पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील व हिंगोली रा.यु.काँ.चे प्रभारी डॉ.संतोष मुंडे , विधान परिषदेचे सदस्य आ.रामराव वडकुते यांच्या उपस्थितीत हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवार दि.17 मार्च रोजी सकाळी 12 वाजता एल्गार मार्चा काढण्यात आला. तसेच मागणीची निवेदन.जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले.
    डॉ.संतोष मुंडे म्हणाले की, बेरोजगार युवकांना पकोडे तळा असे सांगणार्या सत्तांध सरकारला जनताच धडा शिकवणार असा घणाघाती हल्ला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केला.
     या बाबात सविस्तर वृत्त असे की, निवडणूकपुर्वी सरकारने दोन कोटी नोकर्या देण्याचे आश्वासन दिले होते.परंतु अजून दोन हजार नोकर्या सुध्दा दिल्या नाहीत.त्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढली आहे. आज चा युवक रोजगारांसाठी परेशान आहे. या युवकांना जास्तीत जास्त नोकरी मिळण्याकरिता शासकीय नौकर भरती काढण्यात यावी.एमपीएससीच्या या शासनाने जागा कमी केल्या आहेत. त्या जागा लवकरात लवकर वाढवण्यात याव्या. शैक्षणिक फिसमुळे बरेच विद्यार्थीत्यांना पाहिजे ते शिक्षण घेता येत नाही त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे काम या सरकारने करावे. शैक्षणिक कर्ज विद्यार्थ्यांना लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे. हिंगोली एमपीएससीचे परिक्षा केंद्र झालेच पाहिजे. हिंगोली येथील शासकीय रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत. हिंगोली येथील रामलीला मैदानावरील बेरोजगारांना , फुटकळ व्यावसायिकांना व्यवसायाकरिता अकरा महिन्याच्या करारावर जागा उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच रोजगार उपलब्ध करून द्यावा. या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अन्यथा तीव्र लढा उभारण्याचा इशारा या निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे.
     सकाळी 12 वाजता हा एल्गार मोर्चा शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला तसेच या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोर्चेकरांनी केंद्र व राज्य सरकारच्या निषेध करत विरोधात घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. 
  यामध्ये  उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनिल पतंगे, विधानसभा अध्यक्ष राजू नवघरे, कळमनुरी विधानसभा अध्यक्ष डॉ. जयदीप देशमुख,नगर पचांयत उपाध्यक्ष  अप्पासाहेब देशमुख, जि.प.गटनेते मनिषा आखरे, जिल्हा सरचिटणीस बी.डी.बांगर, तालुकाध्यक्ष माधव कोरडे, शहराध्यक्ष जावेद राज, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष देशमुखपंकज बांगर, मनोज बांगर , अमोल देशमुख, सुजय देशमुख, मतीन ईनामदार मेडिया जिल्हाध्यक्ष राज थळपते यांच्यासह जिल्ह्यातील युवकचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच  पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच रामलीला मैदानावरील व्यावसायिकांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. या एल्गार मोर्चाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे यांनी केले होते.













पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments