पंढरपूर येथे गुढीपाडव्याच्या सणादिवशी विद्यमान नगरसेवक यांची झालेली निघृण हत्येबाबत आ.भारत भालके यांनी विधीमंडळात सदर प्रकरणी फोडली वाचा

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!


पंढरपूर LIVE 20 मार्च 2018

पंढरपूर दि.19 - सध्या चालू असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी पंढरपूर शहरात गुढीपाडव्या दिवशी पंढरपूर नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक यांची भर दिवसा निघृण हत्या झाल्याप्रकरणी विधानसभा नियमान्वये पॉईंट ऑङ्ग इन्ङ्गॉमर्ंेशन (हरकतीचा मुद्दा) याद्वारे महाराष्ट्र विधी मंडळात मुद्दा उपस्थित केला. 
तालिका अध्यक्ष महोदय यांनी संबंधित घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन झालेल्या घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे शासनाला आदेश दिले. 
यामध्ये पंढरपूर शहरामध्ये दि.18.03.2018 रोजी दुपारी अंदाजे 1.00 वाजणेच्या सुमारास पंढरपूर शहरातील स्टेशन रोड परिसरात नगपरिषदेचे विद्यमान नगरसेवक यांची निघृणपणे हत्या करण्यात आली. त्यामुळे पंढरपूर शहरात सदर घटना वार्‍यासारखी पसरून या गंभीर घटनेमुळे नागरीकांमध्ये अत्यंत भितीचे व संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
पंढरपूर शहरामध्ये हिंदु नवीन वर्ष गुढी पाडवा अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरा होत असतांना सदर घटनेमुळे नवीन वर्षाच्या दिवशी गुढीपाडवा सणाला गालबोट लागले. तसेच पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या दर्शनाकरिता नवीन वर्षानिमित्त गुढीपाडवा असल्यामुळे बाहेर गांवाहून आलेले भाविक भक्तांवर पंढरपूर येथे घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. भाविक भक्तांना व नागरीकांना सदरच्या घटनेमुळे शहरातील संपूर्ण व्यापारी व लहान-मोठे व्यवसायिक यांनी आप-आपली दुकाने, हॉटेल व इतर व्यवसाय तातडीने बंद करून संपूर्ण शहराचे कर्फ्युचे वातावरण असल्यासारखे तयार झाले होते. त्यामुळे बाहेर गांवाहून आलेल्या भाविक भक्तांना पिण्याचे पाणीही उपलब्ध होऊ शकले नसल्यामुळे त्यांची अत्यंत गैरसोय झाल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला.
सदर घटनेच्या ठिकाणी जिल्हा पोलीस प्रमुख यांनी भेट देऊनही अद्याप पर्यंतही पंढरपूर शहर येथे दहशतीचे वातावरण निवळले नसल्यामुळे संपूर्ण शहरातील व्यापारी, दुकानदार, हॉटेल, लहान-मोठे उद्योजक यांनी आप-आपले व्यवसाय पूर्णपणे बंद केले.  त्यामुळे पंढरपूर शहरातील सामान्य नागरिकांचे जन-जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून अद्यापही शहरामध्ये प्रचंड भीतीचे व दहशतीचे वातावरण पहावयास मिळत आहे. त्यामुळे सदरच्या गंभीर घटनेची व्यापारी वर्गात व लहान मोठे व्यवसायकांनी धास्ती घेतल्यामुळे लहान मोठ्या व्यापारी वर्गात भितीचे वातावरण तयार झाल्यामुळे व शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्यामुळे व्यापारी वर्गाला नाविलाजाने सदर घटनेमुळे प्रचंडप्रमाणात मनस्ताप सहन करून कोट्यावधी रूपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. 
2..
- 2 -
सभागृहामध्ये गृह विभागाचे दोन्हीही गृह राज्यमंत्री(ग्रामीण व शहर) सभागृहामध्ये उपस्थित असल्यामुळे मा.अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून पंढरपूर शहरातील घडलेल्या कालच्या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. तसेच यापूर्वीही पंढरपूर शहरामध्ये अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. या घटनेची सरकारने तात्काळ चौकशी करून सदर घटनेतील आरोपींना त्वरीत अटक करून शहरातील कायदा व सुव्यवस्था पुर्ववत करून जन-जीवन सुरळीत सुरू होणेसाठी व शहरातील निर्माण झालेले दहशतीचे संभ्रमाचे वातावरण निवळून शहरातील नागरिकांना मुक्तपणे राहता यावे. तसेच व्यापारी व छोटे-मोठे व्यवसायिक यांना सुरक्षिततेची हमी देऊन शहरातील नागरिकांमध्ये गुन्या-गोविंदाचे वातावरण व शांतता नांदण्यासाठी अध्यक्ष महोदय आपण  सरकारला तात्काळ आदेश करण्याची मागणी सभापती तालिका अध्यक्ष यांचेकडे आमदार श्री भारत भालके यांनी केली. 
त्यावर विधानसभा तालिका अध्यक्ष महोदय यांनी पंढरपूर शहरामध्ये दि.18.03.2018 रोजी घडलेल्या घटनेची तात्काळ चौकशी करून शहरामध्ये शांतता राखण्यासाठी शासनाने यामध्ये लक्ष घालून त्वरीत उपाय-योजना करावी असे कडक निर्देश मा.अध्यक्ष महोदयांनी दिल्यामुळे पंढरपूर शहरातील वातावरण पूर्वपदावर येईल अशी आशा आमदार श्री भारत भालके यांना व्यक्त केली आहे.
आमदार श्री भारत भालके यांनी विधीमंडळामध्ये पंढरपूर येथील सदर गंभीर घटनेला न्याय दिल्याबद्दल सामान्य जन-माणसात समाधान व्यक्त करण्यात येत असून आमदार श्री भालके यांच्यावर नागरिकांचा विश्‍वास पहावयास मिळत आहे.













पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments