लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 1 मार्च 2018
राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त जि.प. प्रा. शाळा चिंचणी येथे केंद्रस्तरीय अपूर्व विज्ञान मेळावा शाळा व सर्व ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये भंडीशेगाव केंद्रातील सर्व19 जिल्हा परिषद शाळा व 3 विद्यालयातील एकूण 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थींनी सौरउर्जेवर चालणारी पाणबुडी, सौरऊर्जेवर तयार होणारी वीज, यंत्र हवेवरचा हातपंप असे अनेक प्रयोग प्रात्यक्षिकासह करून दाखविले.
या अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन पंढरपूर तालुका पंचायत समितीच सभापती दिनकरभाऊ नाईकनवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना सभापती म्हणाले की, चिंचणी सारख्या शाळेने विज्ञान मेळावा घेवून केंद्रातील मोठ्या शाळांसमोर आदर्श ठेवला आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासो काळे आपल्या भाषणात म्हणाले की वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवला तरच देश महासत्ता होईल. डॉ. ए.पी.जी. अब्दुलकलाम यांचे योगदान देशासाठी महान आहे. यावेळी मोहन अनपट सविता म्हेत्रे, केंद्रप्रमुख प्रभावती कोकणे यांनी विचार व्यक्त केले.
सूत्रसंचालन धोंडीबा क्षीरसागर यांनी केले. यावेळी संपरच कुलदीप कौलगे, मंगेश कौलगे, सोपान कौलगे, मुन्ना मुजावर, दादा सारखे, रमेश जवळेकर, भिमराव मोरे, चंद्रकांत पवार, शरद सावंत, महादेव सावंत, ज्ञानेश्वर सावंत, गोपाळ जाधव, दिक्षा अपनट, सविता सावंत, रूपा पवार, बेबी जाधव आदीसह ग्रामस्थ व केंद्रातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments