लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 1 मार्च 2018
पंढरपूर- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त संभाजी ब्रिगेड पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले होते. भव्य अश्या शस्त्र प्रदशनाने शिवजन्मोत्सव सोहळ्याची सांगता झाली इतिहासाचे साक्षीदार असलेली शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उदगाटन उद्योगपती अभिजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन दि २७ व २८ फेब्रुवारी दोन दिवस टिळक स्मारक मंदिर,रोहिदास मार्ग पंढरपूर येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनासाठी पंढरपूर व परिसरातील सुमारे ८००० विद्यार्थ्यांनी व १००० नागरिकांनी भेट दिली. विशेष म्हणजे अंध शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्श करून शस्त्रांची माहिती दिली. सर्व विद्यार्थी व नागरिक यांनी प्रदर्शनाचे खूप कौतुक केले. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com









0 Comments