लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 1 मार्च 2018
सोलापूर, दि.01 :- दहावीच्या परीक्षेसाठी असलेल्या सेालापूर शहरातील केंद्र परिसरात फोजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी हे आदेश निर्गमित केले आहे. या आदेशामुळे शहरातील 35 केंद्रावरील 100 मीटर परिसरात घोषणा देता येणार नाही. झेरॉक्स सेंटर, टापिंग सेंटर, एस.टी.डी बूथ, संगणक केंद्र, इंटरनेट कॅफे बंद राहतील. केंद्राच्या परिसरात मोबाईल, फॅक्स, ईमेल वापरता येणार नाही. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. हे आदेश 24 मार्च 2018 पर्यंत लागू असतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
*****
शिष्यवृत्तीसाठी जुन्या पध्दतीने
अर्ज करण्याचे आवाहन
सोलापूर, दि.01 :- उच्च शिक्षण संचालनालयाअंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची सन 2017-18 करता महाडीबीटी प्रणालीअंतर्गत ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. तथापि शासनाने सदर शिष्यवृत्तीचे अर्ज जुन्या पध्दतीने मागविण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे आत सन 2017-18 करीता शिष्यवृत्तीचे अर्ज विद्यार्थ्यांनी जुन्या ऑफलाईन पध्दतीने महाविद्यालयाकडे 5 मार्च 2018 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सेालापूर विभाग, सेालापूर यांनी केले आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments