सरपंच पतीवर प्राणघातक हल्ला

चैत्री वारीनिमित्त पंढरीत आलेल्या सर्व विठ्ठलभक्तांचे हार्दिक स्वागत!लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!


पंढरपूर LIVE 27 मार्च 2018

पाटोदा :  तालुक्यातील सौताड़ा येथे राम नवमीच्या सप्ताहादरम्यान झालेल्या भांडणात भाजप कार्यकर्ते तथा सरपंच पती यांच्यावर रविवारी प्राणघातक हल्ला झाला आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात नवनाथ रावसाहेब सानप हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर अहमदनगर येथी खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचे झाले असे, दरवर्षी सौताडा येथे राम नवमीनिमित्त सप्ताहाचे आयोजन केले जाते. रविवारी राम नवमीनिमित्त गावात मिरवणुकीची लगबग सुरु होती. दरम्यान बाळू सानप व इतर काहीजण बूट घालूनच स्टेजवर आले. यावरून नवनाथ सानप यांचे बंधू व बाळू सानप यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. काही वेळातच दोन्ही गटातील समर्थक समोरासमोर आल्याने बाळू सानप यांना धक्काबुक्की झाली. हाच राग मनात धरून बाळू लक्ष्मण सानप व त्यांच्या मामाच्या मुलाने रात्री १२ च्या दरम्यान नवनाथ सानप यांचे घर गाठले. त्यावेळी मिरवणूक संपवून नवनाथ सानप हे जेवण करीत होते. 

कार्यक्रमादरम्यान धक्काबुक्की का केली म्हणून बाळू सानप यांनी थेट कोयत्याने वार करण्यास सुरवात केली. यामध्ये नवनाथ सानप यांच्या तोंडाला मार लागला असून तीन दातही पडले आहेत. त्यांना जखमी अवस्थेत जामखेड येथे उपचाराकरिता नेण्यात आले होते. जखम अधिक असल्याने त्यांना अहमदनगर येथे हलवण्यात आले असून नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. बाळू सानप यांच्याबरोबर आलेला मामाचा मुलगा फरार झाला आहे. सतंप्त नवनाथ सानप यांच्या समर्थकांनी त्याची मोटारसायकल पेटवून दिली आहे. या घटनेमुळे राम नवमीच्या उत्सवाला गालबोट लागले असून सौताडा येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी दुपापर्यंत यासंबंधी गुन्हा दाखल झालेला 








पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments