लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 13 मार्च 2018
येथील हॉटेल अमर चे चालक विनोद अमरनाथ वोहरा (वय-61) रा. दत्त नगर कराड रोड, पंढरपूर यांच्यावर रिव्हॉल्वर रोखून 1 लाख रुपयाची खंडणी हप्ता स्वरुपात मागत त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न करणार्या खंडणीखोरांना पंढरपूर शहर गुन्हे प्रकडीकरण शाखेच्या पोलिसांनी 24 तासात गजाआड केल्याची माहिती पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, हॉटेल अमर येथे दि. 12 मार्च 2018 रोजी सायंकाळी 8:50 वाजता आरोपी निलेश मच्छिंद्र नाईकनवरे, मुकेश नंदकुमार पाटोळे, महेश दिपक वाघमारे, शिवा सतीश लोंढे यांनी कॅश काऊंटर वर बसलेले हॉटेल अमरचे चालक विनोद वोहरा यांना खंडणी मागुन यातील एकाने त्यांच्यावर रिव्हॉल्वर रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पंढरपूर शहरात खळबळ उडालेली होती. पंढरपूर पोलिसांच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत सोशल मिडीयावरुन पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नसल्यामुळे शहरात गुन्हेगारीत वाढ होत असल्याची चर्चा चालु होती. परंतु पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ जेरबंद केल्याने सर्वसामन्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
ज्ञानु कडलासकर याचे सांगणेवरन वरील आरोपींनी एक लाख रुपये हप्ता स्वरुपात खंडणी मागितल्यानंतर अमर हॉटेलचे चालक विनोद वोहरा यांनी हप्ता देण्यास नकार दिला. तेंव्हा आरोपी निलेश नाईकनवरे याने त्यांच्यावर रिव्हॉल्वर रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. परंतु गोळी झाडली गेली नाही. इतर आरोपींनी गोळी झाडण्यासाठी सदर आरोपीला प्रोत्साहन दिले. अशी माहिती विनोद वोहरा यांनी आपल्या फिर्यादीत दिली आहे. त्यानुसार पंढरपूर शहर पोलिस ठाणे येथे सदर आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम 307, 385, 387, 34 आर्म अॅक्ट 3 व 5 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलिस अधिक्षक विरेश प्रभु, अप्पर पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते, यांच्या सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, शहर पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली यातील आरोपी निलेश मच्छिंद्र नाईकनवरे, मुकेश नंदकुमार पाटोळे, महेश दिपक वाघमारे, शिवा सतीश लोंढे सर्व रा. आण्णाभाऊ साठे नगर, जुनी पेठ, पंढरपूर यांना 24 तासात जेरबंद करण्यात आले असून सदर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
ही कामगिरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोसई चंद्रकांत गोसावी, पोसई सत्यजीत अधटराव, सहा. पोलिस फौजदार हणमंत देशमुख, पोहेकॉ. सुजीत उबाळे, पो.ना. गणेश पवार, विशाल घाडगे, राहुल रणनवरे, किशोर गायकवाड, शिवाजी पांढरे, इरफान शेख, सोहेल पठाण यांनी केली. पुढील तपास पोसई. सत्यजीत अधटराव हे करीत आहेत.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com



0 Comments