लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 12 मार्च 2018
सोलापूर जिल्हा शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठानच्या वतीने या वर्षी पासून जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांना शारदाबाई पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष श्रीकांत शिंदे यांनी आज पत्रकार भवनमध्ये आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये दिली.
माहिती देताना शिंदे म्हणाले की, त्यामध्ये देशासाठी बलिदान दिलेले शहीद कुणालगीर गोसावी यांच्या मातोश्री सौ. वृंदादेवी मुन्नागीर गोसावी (पंढरपूर), श्रीमती विमलताई घोलप (उपळाई), सौ. सुमनताई वसंतराव नेहतराव (पंढरपूर), सौ. कुसूमताई लक्ष्मण कसगावडे (बोहाळी, ता.पंढरपूर), सौ.सुवर्णाताई रमेश कुलकर्णी (श्रीपूर, ता.माळशिरस) यांना देण्यात येणार आहेत. तसेच विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणार्या महिलांचाही सन्मान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पंढरपूर नगरपरिषदेच्या महिला सफाई कामगारांना साडी-चोळी देऊन त्यांचाही सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. माजी कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी नेहमीच महिलांच्या बाबतीत 33% वरुन 50% आरक्षण प्रत्येक ठिकाणी देण्याची भुमिका घेतली. म्हणून आज सरपंच ते देशाचे सर्वोच्च स्थान असणार्या राष्ट्रपती पदाचा सन्मान प्रतिभाताई पाटील यांना मिळाला. ते केवळ पवारसाहेबांच्या प्रयत्नांमूळेच. म्हणून साहेबांच्या सामाजिक सिध्दांतानुसार आम्ही काम करत आहोत.
यंदाचे हे पुरस्काराचे पहिले वर्ष असून या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रवादी काँ ग्रेस पार्टीच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ, महिला प्रदेश सचिव वैशाली गुंड-पाटील, पंढरपूरच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले, प्रतिष्ठान चे संस्थापक लक्ष्मीकांत खाबिया, उपविभागीय पोलिस अधिकारी निखील पिंगळे साहेब, पंढरपूरच्या नायब तहसिलदार सीमा सोनवणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले, तालुकाध्यक्षा अनिता पवार, रंजनाताई हजारे, संदीपदादा मांडवे, यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 16 मार्च 2018 रोजी हॉटेल विठ्ठल इन सभागृहात सायंकाळी 5 वाजता संपन्न होणार आहे. तरी नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्रीकांत शिंदे व पंढरपूर शहराध्यक्ष राजन जगताप व सुरज पेंडाल यांनी केले आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments