स्वेरीमध्ये ‘जागतिक महिला दिन’ साजरा

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 11 मार्च 2018

विद्यार्थ्यांनींनी परिस्थितीचा बाऊ न करता सकारात्मक विचार करावा.

-मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड


पंढरपूरः-आजवर विविध स्त्रियांनी समाज व्यवस्थेत दिलेले योगदान पाहून स्त्रियांमुळचे भारत प्रगतीपथाकडे वाटचाल करत असून मुलींनी देखील परिस्थितीचा बाऊ न करता मनामध्ये सतत सकारात्मक विचार ठेवून वाटचाल केल्यास, मोठी स्वप्ने बाळगून त्याच्या दिशेने वाटचाल केल्यास सहज यश साध्य करू शकतो. जीवनाची वाटचाल करत असताना वाटेत अनेक प्रकारची माणसं मिळतात ती सर्व सकारात्मक असतीलच असे नाही. ते आपल्या यशाच्या वाटचालीत अडसर देखील ठरु शकतात त्यासाठी त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तसेच ध्येय साध्य करताना उदभवणाऱ्या अडचणींना, संकटांना ध्येर्याने तोंड देवून सामना केल्यास, स्वतःला अपडेट्स ठेवल्यास इच्छित ध्येय साद्य करू शकतो.’ असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी व्यक्त केले.
                 येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इंन्स्टिटयुटमध्ये जागतिक महिला दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड उपस्थित विद्यार्थ्यांसमोर बोलत होते. विशेष अतिथी म्हणून गटविकासअधिकारी सौ सुलभा वठारे ह्या होत्या. दिपप्रज्वलनानंतर सी.ई.ओ.डॉ. भारुड यांनी ‘इफ यु डोंट अपडेट युवर सेल्फ, सून यु वील बी आऊट डेट’या संदेशाद्वारे विद्यार्थ्यांना उर्जा दिली. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘करिअरच्या दृष्टीने महत्वाच्या अशा प्रशासकीय, वैद्यकीय, औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, या क्षेत्रात मुली ह्या आता मुलांपेक्षा अधिक सरस ठरत आहेत. महिलांना पदाच्या सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी भविष्यकाळात प्रत्येक पुरुषांनी स्त्रियांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.’ असे सांगितले. यावेळी सी.ई.ओ.डॉ. भारुड यांनी स्वतःचे आत्मचरित्र शब्दात गुंफलेली ‘मी एक स्वप्न पहिले’ हे पुस्तक स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे यांना भेट दिली असता प्राचार्य डॉ. रोंगे म्हणाले. ‘या पुस्तकामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल.’ संस्थेचे जेष्ठ विश्वस्थ दादासाहेब रोंगे यांनी ‘महिलेंच्या विकासातील महत्वाची टप्पे सांगून अलीकडील काळात महिला देखील खांद्याला खांदा लावून काम करताहेत’ असे सांगितले. गेल्या आठवडाभर सकाळी सहा ते सकाळी सात वाजेपर्यंत विद्यार्थिनी स्वतंत्र असलेल्या वसतिगृहात प्राणायम घेतल्यामुळे विद्यार्थिनीमध्ये प्रचंड ऊत्साह, उर्जा आल्याचे चेहयावरून जाणवत होते. या उपक्रमाचे सी.ई.ओ.डॉ. भारुड यांनी  मुक्त कंठाने कौतुक केले. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात, क्रीडा, शोध प्रकल्प यामध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा डॉ. भारुड यांच्या हस्ते रोख रक्कम, प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. स्वेरीच्या शिस्तीचे डॉ. भारुड यांनी दिलखुलास स्तुती केली. यावेळी गोपाळपूरच्या सरपंच सौ. विमल आसबे, गटविकास अधीकारी सौ सुलभा वठारे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त विजय शेलारसंस्थेअतर्गंत असणार्‍या इतर तिनही महाविद्यालयांचे प्राचार्यफार्मसीचे प्राचार्य डॉ.आर.जी.कुलकर्णी, डिप्लोमा इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, विद्यार्थी अधिष्ठाता प्रा.एस.आर.गवळी, सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख प्रा. करण पाटील, प्रा. यशपाल खेडकर, सर्व अधिष्ठातासर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी, चारही महाविद्यालयांचे विद्यार्थी प्रतिनिधी, यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थींनी उपस्थित होते.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments