लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 9 मार्च 2018
सोलापूर, दिनांक 9 :- सोलापुरातील होम मैदानावर येत्या रविवारपासून सुरू होणाऱ्या जिल्हा कृषि महोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. महोत्सव यशस्वी होण्यासाठी संयोजन समिती त्याचबरोबर विविध शासकीय यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत. हा महोत्सव शेतकरी, ग्राहक, उत्पादक, वितरक आणि संशोधक यांच्यासाठी एक दुवा म्हणून महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी व्यक्त केला.
कृषी महोत्सवातील पत्रकार कक्षाचे उद्घाटन आज डॉ.भारूड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमंत पाटोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, प्रकल्प संचालक आत्मा विजयकुमार बरबडे, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, प्रकल्प संचालक रवींद्र माने आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.भारूड यांनी कृषी महोत्सवाच्या नियोजनाबाबत पत्रकारांसमवेत संवाद साधला.ते म्हणाले, सोलापुरातील शेतकरी पुढारलेला आहे यात शंका नाही.मात्र तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्याचे उत्पन्न अधिकाधिक वाढावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे.त्यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील स्टॉल्समध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेती तसेच शेतीपूरक व्यवसायासाठी आवश्यक ती सर्व माहिती मिळू शकेल. या माहितीचा वापर करून शेतकरी आपले उत्पादन वाढवू शकतील. या महोत्सवाचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी घ्यावा. यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत प्रदर्शनस्थळाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या.
राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत आयोजित महोत्सवाचे उद्घाटन रविवार दिनांक 11 मार्च रोजी सकाळी 10 वाजता सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री विजय देशमुख असतील. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी उपस्थित राहणार आहेत. तसेच खासदार विजयसिंह मोहिते पाटील, खासदार ॲड. शरद बनसोडे, खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, आमदार ॲड. रामहरी रुपनवर, आमदार दत्तात्रय सावंत, आमदार प्रशांत परिचारक, आमदार गणपतराव देशमुख, आमदार दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार हनुमंत डोळस, आमदार भारत भालके, आमदार प्रणिती शिंदे, आमदार रमेश कदम, आमदार नारायण पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील, कृषि व पशुसंवर्धन सभापती मल्लिकार्जून पाटील, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, पोलिस आयुक्त महादेव तांबडे, पोलिस अधीक्षक विरेश प्रभू आदी उपस्थित असतील.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com



0 Comments