चैत्री वारीनिमित्त पंढरीत आलेल्या सर्व विठ्ठलभक्तांचे हार्दिक स्वागत!लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 26 मार्च 2018
महाराष्ट्र शासनाने दि.१ फेब्रुवारी २०१७ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील नागरीकरणाचा वेग वाढला असुन सध्या राज्यातील सुमारे ५० टक्के क्षेत्राचे नागरीकरण झाले आहे. वाढणा-या नागरीकरणामुळे येणा-या जबाबदा-या व कर्तव्य स्वत:च्या आर्थिक क्षमतेवर नगरपरिषदांनी पार पाडणे अपेक्षीत आहे. नागरी भागाच्या सुनियोजीत व संपन्न विकासासाठी लोकाभिमुख स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासनाकडुन महत्वाची भुमीका बजावली जाते. राज्यातील स्थानिक संस्था आर्थिक दृष्ट्या स्वयंपुर्ण असाव्यात व स्वत:च्या आर्थिक क्षमतेवर त्यांनी नागरिकांना मुलभुत सेवा पुरवाव्यात हि रास्त अपेक्षा आहे. या अनुषंगाने आर्थिक सक्षमता अत्यंत महत्वाची आहे.
तथापि सर्वसाधारणपणे शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, शहरातील सर्वसाधारण सामान्य नागरीक कराचा भरणा वेळेत करीत असतो. परंतु कांही नागरीक मालमत्ता कराची रक्कम भरणा करण्याचे टाळतात. आणि त्यामुळे सुमारे २० टक्के नागरीकांकडेच नगरपरिषदेकडे एकुण थकबाकीच्या ८० टक्के रक्कम प्रलंबीत असते. या प्रलंबित थकबाकींच्या वसुलीसाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. नागरी स्थानिक संस्थ्यांच्या मालमत्ता कराच्या रकमेची व थकबाकीची वसुली प्रभाविपणे झाल्यास त्यांचे आर्थिक सक्षमता वाढण्यास व पर्यायाने नागरीकांना मुलभुत सुविधा कार्यक्षमतेने उपलब्ध करुन देण्यास मदत होणार आहे. त्यादृष्टीने राज्यातील सर्व नगरपरिषदा / नगरपंचायती यांनी दि.३१.०३.२०१८ पर्यंत मालमत्ता कर व पाणीपट्टी यांची १०० टक्के वसुली करणेबाबतचे आदेश सर्व नगरपरिषदांना दिले आहेत.
कर वसुलीची मोहिम प्रभाविपणे राबविण्याच्या दृष्टीने संबधित नगरपरिषद / नगरपंचायतींच्या क्षेत्रातील मोठे थकबाकीदार निश्चित करण्यात यावे व त्यांची यादी तयार करुन त्यांच्यापासुन थकबाकी वसुलीची मोहिम सुरु करण्यात यावी. यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखुन पुरेशी व वाजवी संधी देवुनही जे थकबाकीदार रक्कम देणार नाहीत त्यांच्या मालमत्तेच्या बाबतीत महाराष्ट्र नगरपलिका अधिनियम १९६५ मधील कलम १५२ ते १५५ मधील तरतुदीनुसार जप्तीची कारवाई करावी. तदनंतरही सदर मालमत्ता धारकाने थकबाकीची रक्कम न भरल्यास त्या मालमत्तेला उक्त अधिनियमातील कलम १५६ अनुसार कार्यवाही करुन या मालमत्तेस नगरपरिषदेचे नाव लावण्याची तरतुद कायद्यामध्ये आहे.
यास अनुसरुन पंढरपूर नगरपरिषदेने शहरातील सर्व मालमत्ता धारकांना थकीत व सन २०१७-१८ च्या कराची रक्कम भरणेसाठी महाराष्ट्र नगरपलिका अधिनियम १९६५ चे कलम १५० अन्वये मागणी बीले देण्यात आली होती. तसेच शासनाने ज्या मालमत्ता धारकांकडे कराची रक्कम येणे बाकी आहे त्यांनी ती थकीत कराची रक्कम वेळेत न भरल्यास त्या रक्कमेवर प्रति महा २ टक्के शास्तीची (दंड) आकारणीची तरतुद केलेली आहे त्यामुळे नगरपरिषदेने या २२८१ थकीत मालमत्ता धारकांना जप्तीपुर्व सुचना नोटीसा दिलेल्या आहेत. व १२०० मालमत्ता धारकांवर जप्तीच्या कारवाई करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शासन निर्णयानुसार नगरपरिषदेने थकबाकीधारकांची यादी तयार केली असुन या थकबाकीदारांवर कलम १५२ नुसार मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या मार्गदर्शनाखाली जप्तीची कारवाई सुरु करणार असल्याची माहिती कर निरीक्षक सुनिल वाळुजकर यांनी दिली व बाळकृष्ण तुकाराम पुरंदरे, दत्तात्रय उर्फ दादासाहेब शिवाजी देशमुख, गफुरसो इस्माईल सो.महेबुब शेख व इतर, नागनाथ केरनाथ जोगी, चौरुनाथ केरनाथ जोगी, हनिफा दाऊद सावकार, फारुक बशीर अहमद बोहरी, दास जगन्नाथ अस्टेकर, भारत बापूर मुळे, निर्मला फराटे, सतिशकुमार शरदचंद्र सोलापूरे, महेश प्रभाकर चव्हाण, दिपक ,विलास वसंत सदावर्ते, बाळकृष्ण तुकाराम भोसले, अशोक बाळासो तमखाने, हिराबाई मस्के, दिपक,विलास वसंत सदावर्ते, संतोष सुभाष पडवळे, सिद्राम नामदेव गंगथडे, प्रल्हाद ग.पवार व गणेश शिंदे,सुरेश बापू जाधव, राजाराम दगडु कटके, म्यु.पल भाडेकरी संपत कोंडिबा आसबे, नारायण दत्तात्रय पडवळे, प्रल्हाद बाळकृष्ण आयाचित, सरस्वती गंगाधर उत्पात, शालिनी बाळकृष्ण कुलकर्णी/उंबरकर, विश्वनाथ ऐदु परचंडे, म्यु.पल. भाडेकरी हेमंत नारायण मैदर्गीकर, उमा दिलीप अवधुतराव, बंजरंग सिताराम झिरपे एकुण ३१ मालमत्ता धारकांचे नळ कनेक्शन तोडण्यात आलेले आहेत. यावेळी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी कर विभागाची माहिती देताना शहरात सध्या १७७९७ मालमत्ता धारक व ५०९२ झोपड्या आहेत. यापैकी शहरातील मालमत्ता धारकांकडील र.रु.१४ कोटी पैकी र.रु.६.१८ कोटी येणे बाकी आहे व झोपडपट्टी धारकांकडे र.रु.२कोटी ५८ लाख येणे बाकी आहे. सदरची रक्कम वसुल करणेकामी नगरपरिषदेतील प्रशासन अधिकारी शरद कुलकर्णी लेखापाल ज्ञानेश्वर खंडागळे भंडारपाल विजय माचरे पाणीपुरवठा अभियंता अशोक भालेराव मिळकत व्यवस्थापक चिदानंद कोळी हिवताप अधिकारी धर्माण्णा गजाकोष वारंट लिपीक संजय माने वरिष्ठ लिपीक विजय पवार, बाळासाहेब कदम, राजेद्र देशपांडे अनिल अभंगराव या विभाग प्रमुखाच्या अधिपत्याखाली ९ विशेष वसुली-जप्ती पथक तयार करुन ६० कर्मचा-याची या विशेष वसूली पथकाची नेमणूक करण्यात आली असून या विशेष पथकाद्वारे थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.सदरची वसूली होण्यासाठी जे थकबाकीदार कराची रक्कम भरणार नाहीत अशा मालमत्ता धारकांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार असुन स्पिकरद्वारे त्यांच्या घरासमोर थकबाकीची रक्कम भरावी म्हणुन नावे पुकारण्यात येत आहेत.
सदर कराची रक्कम वसुल झाल्यासच या शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध होणार आहे. तरी सदरची कटुता व होणारी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी थकीत मालमत्ता धारकांनी आपली कराची रक्कम त्वरीत नगरपरिषदेकडे जमा करणेसाठी नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले व मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी आवाहन केले आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments