चैत्री वारीनिमित्त पंढरीत आलेल्या सर्व विठ्ठलभक्तांचे हार्दिक स्वागत!लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 26 मार्च 2018
निलेश चाळक बीड :-वाहतूक पोलीस वाहनांची तपासणी करीत असताना एका ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने ट्रक न थांबवता पोलिसाला चिरडले. यात वाहतूक पोलिसाचा जागीच मृत्यू झाला आहे. अनिल शालिग्राम शिसोदे (५२, अमळनेर) असे मयत पोलिसाचे नाव आहे. आज सकाळी महामार्ग पोलीस चौकीसमोरच ही घटना घडली. धडक दिल्यानंतर ट्रक चालक पसार झाला असून ट्रक मात्र पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतला आहे.
धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग २११ वर चाळीसगाव नजीक महामार्ग पोलीस चौकीसमोर वाहनांची तपासणी सुरू होती. तपासणी दरम्यान शिसोदे यांनी ट्रक चालकाला थांबण्याचा इशारा केला. तरीही ट्रक चालकाने वाहन न थांबवता ते थेट शिसोदे यांच्या अंगावर घातल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयत शिसोदे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, एक मुलगी, आई – वडील व दोन भाऊ असा परीवार आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून ट्रक चालकांच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments