चैत्री वारीनिमित्त पंढरीत आलेल्या सर्व विठ्ठलभक्तांचे हार्दिक स्वागत!लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
बीड (निलेश चाळक यांजकडून) :-ग्रामविकास मंञी पंकजा ताई मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील जिरेवाडी येथील भागवत बळीराम चाळक यांच्या दक्षिण उत्तर 24.1/2 फुट व पुर्व पश्चिम 33 फुट जागेची सन 2015/16 ची पिटीआर जिरेवाडी ग्रांमपंचायत कडून काढली असता त्यावर पुर्व पश्चिम 29 फुट व दक्षिण उत्तर 18.1/2फुट अशी प्लाँटची साईज दाखवली होती त्यांमुळे भागवत चाळक यांच्या लक्षात आले कि आपल्या प्लाँटची पिटीआर वर कमी साईज दाखवण्यात आली आहे. तेव्हा त्यांनी आपला अर्ध्या प्लाँटची मोजणी केली असता त्यांच्या लक्षात आले कि आपले घर फक्त 18.1/2फुटावर बांधण्यात आले आहे आणि आपली उर्वरीत जागा शिल्लक आहे.
तेव्हा त्यांनी आपल्या दक्षिण बाजूच्या शेजार्याला सागितंले कि आमची येथे 5 फुट जागा शिल्लक आहे तेव्हा तो शेजारी म्हणाला कि येथे तुमची जागा शिल्लक नाही तुमची जागा तेवढीच आहे तेव्हा भागवत चाळक यांनी आपली सन97/98ची पिटीआर संबधित शेजार्याला दाखवली तर ते म्हणाले तुमची पिटीआर चुकलेली आहे. तेव्हा भागवत चाळक यांनी ग्रामसेवक जिरेवाडी यांच्याकडे या सदर्भांत तक्रार केली असता ग्रामसेवक जिरेवाडी हे भागवत चाळक यांना म्हणाले तुमचा प्लाँट तेवढाच आहे मी यात काहीच करू शकत नाही.
तेव्हा उर्मिला भागवत चाळक व निलेश भागवत चाळक यांनी जिल्हाधिकारी ,तहसिलदार,गटविकास अधिकारी,जिल्हापरिषद सिईओ ,पोलीसअधिक्षक,यासह संबिधत अधिकार्यांना भेटून आपला प्लाँट चोरीला गेल्याची तक्रार केली होती आणि आमचा चोरीला गेलेला प्लाँट शोधून देण्याची मागणी केली होती त्यामुळे आत्ता जिरेवाडीच्या चाळक कुंटूबियांना जिल्हाप्रशासन न्याय देणार का ? अशी चर्चा जिरेवाडी ग्रामस्थ करत आहेत.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments