चैत्री वारीनिमित्त पंढरीत आलेल्या सर्व विठ्ठलभक्तांचे हार्दिक स्वागत!लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 26 मार्च 2018
भुवैकुंठ पंढरी नगरीच्या प्रमुख चो वार्यांपैकी एक प्रमुख वारी म्हणजेच चैत्री वारी होय. कामदा एकादशी दिवशी पंढरीत भरणार्या चैत्री यात्रेच्या सोहळ्यासाठी अनेक भाविक मोठ्या संख्येने पंढरीत दाखल झाले आहेत. श्रीविठ्ठल रुक्मिणीमातेच्या पददर्शनासाठी दर्शन मंडपातील सात मजले भरुन चंद्रभागा घाटापर्यंत दर्शनबारीत वारकरी भाविक उभे आहेत. या वारकर्यांना पिण्याच्या स्वच्छ फिल्टरयुक्त पाण्याची सोय मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे. पिण्याचे पाणी भाविकांना देण्यासाठी श्रीक्षेत्र आळंदी येथील स्वयंसेवक सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहेत.
पंढरपूर नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने चंद्रभागेच्या पैलतिरावरील 65एकर परिसर , वाळवंट परिसर आदी ठिकाणी अडीचशे ते तिनशे शौचालये उभी करण्यात आली आहेत. 65 एकर परिसरातील भाविकांना पिण्याच्या स्वच्छ पाण्याचे टँकरची सोय नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेली आहे. वाळवंटात सर्वत्र हायमास्ट लॅम्प्ससह आवश्यक तेथे दिवाबत्तीची सोयही करण्यात आलेली आहे. शहरातील विविध परिसर, वाळवंट, 65 एकर परिसराची स्वच्छता करण्यात आलेली आहे. या वारीनिमित्त नगरपरिषदेचे 500 अतिरिक्त कर्मचारी तैनात आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संपुर्ण पोलिस यंत्रणाही सज्ज आहे.
मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांना त्वरित आणि सुलभ दर्शन मिळावे यासाठी व्हीआयपी आणि ऑनलाईन दर्शन बंद करण्यात आले आहे. चैत्री एकादशी निमित्त श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेची महापुजा भास्करगिरि महाराज व प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री.सचिन ढोले यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
टाळमृदंगाच्या निनादात व विठुनामाच्या जयघोषात अवघी पंढरी नगरी दुमदमून गेली असून चैत्री वारीचा हा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा पहाण्यासाठी अवघ्या वैष्णव भक्तांचा मेळा पंढरीत दाखल होत आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments