पंढरपूर तालुक्यातील उपरी गावाजवळ एस.टी. बसखाली चिरडल्याने तरूणाचा मृत्यू! रस्त्याचे कामात ठेकेदाराने मुरूमाऐवजी काळी माती वापरल्याने घडला अपघात...

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!


पंढरपूर LIVE 26 मार्च 2018

रस्त्याच्या कामात ठेकेदाराकडून मुरूमाऐवजी चक्क काळी माती वापरल्याने रस्त्यावर उडणाऱ्या धुराळ्यात समोरचे काहीच न दिसल्याने एक युवक समोरून आलेल्या एस.टी. बसखाली चिरडून जागीच ठार झाला.
उपरी, ता. पंढरपूर येथील कासाळ ओढ्याजवळ आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. 

वरील वेळी व ठिकाणी विठ्ठल तुकाराम ताठे (वय-23), रा. धोंडेवाडी, ता. पंढरपूर हा तरूण मोटारसायकलवरून पंढरपूरकडे जात असताना समोरून साताऱ्याकडे जाणाऱ्या एस. टी. बसखाली गेला. या अपघातात बसखाली चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर एकजण जखमी झाल्याचे समजते.

सदर अपघातास येथील रस्त्याचे निकृष्ट काम करणारा ठेकेदार जबाबदार असल्याने संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी होत आहे.








पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments