चैत्री वारीनिमित्त पंढरीत आलेल्या सर्व विठ्ठलभक्तांचे हार्दिक स्वागत!लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 26 मार्च 2018
आज भुवैकुंठ पंढरी नगरीत चैत्री एकादशीचा नयनरम्य सोहळा साजरा होत आहे. कर्नाटक, महाराष्ट्रासह विविध भागांतून जवळपास अडीच लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.
आज चैत्र महिन्यातील कामदा एकादशी निमित्त पहाटे श्री. विठ्ठल रखुमाईची महापूजा मंदिर समितीचे सदस्य भास्करगिरी महाराज व मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते संपन्न झाली.
शेकडो वर्षापूर्वी कर्नाटकच्या हम्पी येथून श्री विठ्ठलाची मूर्ती श्री.भानुदास महाराज यांनी पंढरीत परत आणली होती. या मुर्तीची चैत्र शुद्ध एकादशीला पंढरीतील मंदिरात स्थापना करण्यात आली. या आनंदा प्रित्यर्थ श्रीविठ्ठलाला आज पुरण पोळीचा नेवैद्य दाखवला जातो अशी आख्यायिका सांगितली जाते ..
शिखर शिंगणापूरच्या शंभु महादेवाची यात्रा असल्याने तेथे जाणाऱ्या अनेक कावडीना चंद्रभागेत स्नान घालून वाजत गाजत या कावडी पंढरी नगरीत मिरवल्या जातात व श्रीविठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनानंतर शंभू महादेवाच्या विवाह सोहळयासाठी या कावडीसह भाविक शिखर शिंगणापूरच्या दिशेने वाटचाल करतात.
आज पहाटेपासूनच वारकरी भाविक चंद्रभागेत स्नान करून श्रीविठूरायाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत उभे राहत आहेत. दर्शनासाठी पाच ते सहा तासाचा कालावधी लागत आहे.
सर्वत्र भगव्या पताका खांद्यावर घेतलेले भाविक आढळून येत असून विविध दिंड्या प्रदक्षिणा मार्गावरून नगरप्रदक्षिणा घालत आहेत. विठ्ठलनामाच्या जयघोषाने व टाळ मृदंगाच्या निनादाने अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments