गजानन येथील पाण्याची टाकीचे पाईपलाईन बदलल्याने नागरिकांकडून समाधान

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 9 मार्च 2018

    कॉग्रेस व संभाजी ब्रिगेडने केली होती सडलेली 
पाईपलाईन बदलण्याची मागणी !

  पंढरपूर शहरातील गजानन नगर येथील पाण्याच्या टाकीवरुन परिसरातील वृंदावन नगर,पुंडलीक नगर,परदेशी नगर,येळेवस्ती,गणेश नगर,गुरुकृपा सोसायटी,माळीवस्ती,ओंकार नगर आदी उपनगरांना या पाण्याच्या टाकीवरुन पाणी पुरवठा केला जात होता.मात्र या टाकीवरुन पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन पुर्णत: सडली आहे.त्यामुळे तातडीने बदलण्यात यावी अशी मागणी कॉग्रेस आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्याधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती.अखेर या मागणीची दखल घेत तातडीने पाईपलाईन बदलण्यात आल्याने परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
     आज नव्याने बसविण्यात आलेल्या पाईपलाईनची परिसरातील नागरिकांच्या वतीने महिला दिनानिमित्त मीरा वाघ,लता माळी,उषा डोके,आनंदी फाळके,मिनाक्षी मुळे,द्रोपदी माळी,सौ.घोडके यांच्या हस्ते  पुजा करण्यात आली.यावेळी समाजसेवक दिपक येळे,पुरषोत्तम देशमुख,आबा फाळके,रामचंद्र वाघ,वसंत माळी,शिवाजी माळी,शिवाजीराव माळी,अजित चव्हाण,हर्षवर्धन देशमुख,विठ्ठल कदम आदी उपस्थित केले होते.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments