लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 16 मार्च 2018
काल अक्लककोट ते पंढरपूर प्रवासादरम्यान कर्नाटकातील एस.टी. बस. मध्ये प्रवास करणारे एक दांपत्य पंढरपूरमध्ये आल्यानंतर एस.टी. बसमध्ये बेशुध्दावस्थेत आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. केवळ पंढरपूर लाईव्हने ही बातमी सर्वप्रथम प्रसिध्द केली होती. आत्तार्यंत पंढरपूर लाईव्हनेच या घटनेचा वेध घेवून याबाबत सत्य वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आज दुपारी हे दोघे पती पत्नी शुध्दीत आले. सामान्य रुगणालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार सुरु होते परंतु ते शुध्दीवर येत नसल्याने त्यांना येथील अपेक्स हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते. ते आज दि. 16 मार्च रोजी दुपारी शुध्दीवर आल्यानंतर पंढरपूर शहर पोलिसांनी अधिक तपास केला असता त्यांना बेशुध्द करुन लुटपाट केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गजानन किसनराव शिंदे (52) व सौ. कोकिळा गजानन शिंदे (47), रा. आसराई नगर, डाबकी रोड, जुने शहर अकोला (विदर्भ) हे दोघे काल हुमनाबाद ते पंढरपूर एस.टी. बस क्र. के.ए. 38 एफ. 946 या कर्नाटक च्या बसमधून प्रवास करत असताना त्यांना गाणगापूर येथून पुढे 15 कि.मी. आल्यानंतर एका अनोळखी इसमाने पोह्यामधून डबीतील बुकटीसदृश्य गुंगीचे औषध खाण्यास दिले. व त्यांच्याकडील एकुण 20 हजार रुपयेचा मुद्देमाल व रक्कम चोरुन नेली. यामध्ये , 8 ग्रॅम सोनेचे दागिणे, एक सॅमसंगचा मोबाईल व एसबीआयचे एटीएम कार्ड रोख रक्कम 500 रु. असा ऐवज लंपास केल्याची फिर्याद या दांपत्याने नोंद केली आहे. सदर गुन्हा पुढील तपासासाठी गाणगापूर येथील पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आला आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments