लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 15 मार्च 2018
डिप्लोमा प्रोजेक्ट स्पर्धा व पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन
राज्यातील डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना होणार फायदा !
पंढरपूरः-येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय व द इन्स्टिटयूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडीया), सोलापूर लोकल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आज १७ मार्च २०१८ रोजी श्री विठ्ठल अभियांत्रिकीत ‘इलेक्ट्रोकॉम चॅलेंज २०१८’या संशोधनात्मक प्रोजेक्ट स्पर्धा व भव्य पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन केल्याची माहीती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्यातील डिप्लोमा इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग व कॉम्प्यूटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरींग या विभागात शिक्षण घेणाऱ्या व या अभ्यासक्रमाशी संलग्नित असलेल्या शाखेतील विद्यार्थ्यांसाठी या एक दिवसीय‘इलेक्ट्रोकॉम चॅलेंज २०१८’ या राज्यस्तरीय संशोधनात्मक प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी लातूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. अजय आगरकर व ग्रीन टीन सोल्युशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राज डुबल हे उपस्थित राहणार आहेत. यास्पर्धामधून उत्कृष्ठ संशोधन प्रोजेक्ट सादर करणाऱ्या स्पर्धकांना विभागानुसार अनुक्रमे रु.१० हजार, रु.७ हजार व रु.३ हजार तसेच पोस्टर प्रदर्शनासाठी प्रथम रु.अडीच हजार, द्वितीय रु. दीड हजार व तृतीय एक हजार रु. व प्रशस्तीपत्रक अशी बक्षिसे ठेवली असून याचे उदघाटन आज दि. १७ मार्च २०१८ रोजी सकाळी ०९.३० वा. होणार आहे. सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य प्रा. एस.एन.कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ.पी. एम. पवार तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. अनुप विभूते, कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख प्रा.सौ. व्ही.डी. जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आयोजित केली आहे. समन्वयक प्रा.आर.बी.कागदे, प्रा. अक्षय जाधव व इतर प्राध्यापकांच्या सहकार्याने हे ‘इलेक्ट्रोकॉम चॅलेज २०१८’ संपन्न होणार आहे. या संशोधन महोत्सवात आय.ई.आय.चे सोलापूर चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. बी.पी.रोंगे, सचिव प्रा. एस.एम.शेख व महाविद्यालयाचे प्राद्यापक वर्ग मार्गदर्शन करणार आहेत.या ‘इलेक्ट्रोकॉम चॅलेंज २०१८’ प्रोजेक्ट स्पर्धा व प्रदर्शनासंबधी अधिक माहीतीसाठी समन्वयक प्रा.आर.बी.कागदे (मोबा.नं.९९७५३८२२२३) व प्रा.अक्षय जाधव (मोबा.नं. ९५५२६९०५३५), यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments