लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 9 मार्च 2018
रोंगे यांचे कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यांचे प्राथमिक
शिक्षण याच शाळेत झाले असल्यामुळे त्यांनी सामाजिक जाणीव ठेवून आपण
समाजाचे काही तरी देणे लागतो या भूमिकेने शाळेला दोन लोखंडी कपाटे व
मुलांच्या भविष्यतीत शौक्षणिक गरज ओळखून आवश्यक आधुनिक शिक्षण
प्रणालीतील साहित्य त्यांनी शाळेला भेट दिली. यावेळी मनोगत व्यक्त करताना
रोंगे म्हणाले ‘ प्रत्येक माणसाने मनामध्ये चांगले विचार ठेवून दुसऱ्याला चागले
विचार दिले पाहिजेत, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. समाजाचे
आपल्यावर ऋण आसतात. त्या ऋणातून प्रत्येकाने उतराई होणे आवश्यक आहे.’
यावेळी शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. अनुराधा कुलकर्णी, सरपंच श्री. रमेश हाके,
श्री. बलभीम रोंगे, प्रा. बजरंग रोंगे, शिक्षण समिती अध्यक्ष श्री. सोमेश्वर बामणे,
श्री. अंकुश रोंगे, श्री, समाधान रोंगे, श्री. विलास रोंगे, प्रा. सुभाष कदम आदी
मान्यवर उपस्थित होते. यावेळी मा. सरपंच श्री रमेश हाके व प्रा. बजरंग रोंगे
यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रा. रोंगे यांनी मुलांना प्रोत्सहान देण्यासाठी
वडील कै. दाजी संदीपान रोंगे यांच्या स्मरणार्थ शाळेतील चौथी वर्गात प्रथम
येणाऱ्या दोन विद्यार्थ्यासाठी दर वर्षी दोन सायकल देण्याचे जाहीर केले आहे. मॅग्ना
सिटींग इंडिया या कंपनीत कार्यरत असून सी.एस. आर. अंतर्गत ही मदत त्यांनी
शाळेला केली आहे. श्री. जतकर , सौ. लिगाडे, सौ. संख, सौ.दोडमिसे, सौ. मुलाणी
हे शिक्षक उपस्थित होते. स्वागत व प्रस्थाविक सौ. कुलकर्णी यांनी केले.
सूत्रसंचालन श्री. प्रकाश राऊत यांनी केले. मान्यवरांचे आभार श्री. समाधान रोंगे
यांनी मानले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments