लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 14 मार्च 2018
सोलापूर दि.12 :- पोलीस भरती प्रक्रियेतील 1600 व 800 मीटर धावणे शारीरिक चाचणी दिनांक 12 ते 21 मार्च 2018 रोजी सकाळी 5 ते 11 या वेळेत केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्र ते हिरज दरम्यान होणार आहे. त्यामुळे वरील कालावधीत केगाव पोलस प्रशिक्षण केंद्र ते हिरज गाव दरम्यानचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 च्या कलम 33 (1) (ब) अन्वये दिनांक 12 ते 21 मार्च 2018 रोजी सकाळी 5 ते 11 या वेळेत केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्र ते हिरज मार्ग वाहतुकीस बंद केला असून पर्यायी मार्ग म्हणून केगांव पोलीस प्रशिक्षण केद्राकडून हिरज गावाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने डेंटल कॉलेज - देगांव टोल नाका – बीएमआयटी कॉलेज मार्गे हिरज गावाकडे जातील. हिरज गावाकडून केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्राकडे जाणारे सर्व प्रकारचे वाहने बीएमआयटी कॉलेज- देगांव टोल नाका-डेंटल कॉलेज मार्गे केगावकडे जातील.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments