स्वेरीत ‘पालक मेळावा’ संपन्न

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 14 मार्च 2018

विद्यार्थ्यांच्या विकासात स्वेरीच्या प्राध्यापकांचे उल्लेखनीय कार्य
           -पालक प्रतिनिधी जे.बी. गायकवाड

पंढरपूर-‘आमच्या पाल्ल्यांचा बौद्धीक विकास हा येथील उच्च शिक्षित प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे होत असून त्यांचा भविष्यकाळ उत्तमपणे होण्यासाठी येथील प्राध्यापक वर्गाची शिक्षण देण्याची जी तळमळ दिसून येते ती खरोखरच उल्लेखनीय अशी आहे.विद्यार्थी गुणवंत बनून कृतीशील होण्याचा उपक्रम देखील विद्यार्थ्यांना बळ देणारा असा आहे. त्यामुळे स्वेरीची टीम अभिनंदनास पात्र आहे.म्हणून स्वेरीने आम्ही टाकलेला विस्वास सार्थ ठरविला.’असे प्रतिपादन चळे येथील शिक्षक तथा पालक प्रतिनिधी जे.बी. गायकवाड यांनी केले.
          श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट संचलित पदवी अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाचा आज पालक मेळावा आयोजित केला होता. त्यात पालक प्रतिनिधी म्हणून चळे येथील शिक्षक जे.बी. गायकवाड उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. प्रारंभी उपप्राचार्य प्रा. एस.एन.कुलकर्णी यांनी सर्व पालकांचे स्वागत करून ‘पालक मेळावा’ आयोजिण्याचा हेतू सांगून याद्वारे ‘प्राध्यापक व पालक’ यांचा सुसंवाद साधल्याच्या फायदा विद्यार्थ्यांना होतो’ असे सांगून स्वेरीचे शैक्षणिक धोरण व उपक्रम सांगितले. ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंटचे प्रा. श्रीनिवास दर्शने यांनी पदवी नंतर कॅम्पस प्लेसमेंट मधून दरवर्षी वाढत जाणारी आकडेवारी सादर केली. तसेच नोकरीच्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या बाबींपैकी आदर, शिस्त, इंग्रजी संभाषण व वर्तणूक याबाबत दिले जाणारे प्रशिक्षणाविषयी महत्वपूर्ण माहिती दिली. इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकॉम्युनिकेशन इंजिनीअरिंग विभागाचे प्रमुख डॉ.अनुप विभूते यांनी ‘इलेक्ट्रॉनिक्स मधील संधी व त्याचे महत्व सांगून भविष्यकाळात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.’ असे सांगितले. महिला पालक प्रतिनिधी सौ.अरुणा फाकडे म्हणाल्या की, आम्ही आमच्या पाल्यांना शिक्षण क्षेत्रात विशेषतः ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांसाठी बँड बनलेल्या स्वेरीत आवर्जून पाल्यांच्या भविष्याचा विचार करून प्रवेश घेतला आणि स्वेरीने आम्ही पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास नेत आहेत याचा अभिमान वाटतो.’ प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ. सतीश लेंडवे यांनी अभ्यासक्रम, नियमित घेतल्या येणाऱ्या टेस्ट, अवघड वाटणाऱ्या विषयांसाठी जादा वर्ग, विध्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली. यावेळी अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षातील परीक्षेमध्ये सी.जी. पी.ए. नुसार विद्यापिठाच्या परीक्षेत १० पैकी १० गुण मिळविलेले आशुतोष जवंजाळ, महेश फुटाणे, प्रनिल नागरस, रोहित बाडगुडे, शुभम कदम, कपिल रोंगे, अश्विनी पाटील, शुभम शिंदे, प्रतिमा जाधव, स्नेहल खताळ, सोनाली चव्हाण, योगिता मासाळ,चैताली बोचरे, अबोली गायकवाड, सुमन राव, श्वेता मेंढेगिरी, परवेश पंगुडवाले,सुनील सोनार, रोहित आदलिंगे, महेश माने, ऋतुजा कचरे, अमित धानुरे, एजाज शेख, सुरज चव्हाण, महेश भारती, प्रदीप साठे, पवन गवळी-परीट, आदित्य धायगुडे, मृणाल फाकडे, श्रीरंग अत्रे, अमित गोरे, प्रियांका कांबळे, कोमल मोरे, रणजीत नागणे, सायली अवताडे, आशुतोष पाटील, पद्मजा शेटे, इशिता महाजन, सौरभ शिंदे, शुभम विटेकारी, किरण केदार आणि श्रुती कवडे या तब्बल ४२ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जालिंदर कदम, सुनील जाधव, फटाळ, अंकुश गवळी, सौ अनिता राजमाने, गोडसे, सुलक्षणा शिंदे, आदलिंगे, आदी पालकांनी आपले विचार, पर्याय व समस्या व्यक्त केल्या यावर अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी  पालकांच्या विचारांचे स्वागत केले. पुढे बोलताना डॉ. पवार म्हणाले की, ‘ज्ञान, कौशल्य आणि योग्य दृष्टीकोन’ हे महत्वाचे तीन गुण जर विध्यार्थ्यांमध्ये असले तर तो कुठेही कमी पडणार नाही असे सांगून डॉ. पवार यांनी महाविद्यालयीन जीवनात कसा अभ्यास केला ? आणि अल्पावधीत यश मिळवत संशोधन क्षेत्रात प्रगती कशी साद्य केली याबाबत आपले अनुभव सांगितले. यावेळी  सिव्हीलचे विभाग प्रमुख डॉ. नवनाथ खडके, प्राध्यापकवर्ग व  जवळपास ५०० पालकवर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार प्रा. अमोल चौंडे यांनी मानले. 





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments