लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 14 मार्च 2018
पंढरपूर,:- मोहोळ तालुक्यात जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव मंगळवार दिनांक 20 मार्च 2018 रोजी दुपारी 12.00 वाजता तहसिल कार्यालय मोहोळ येथे आयोजित केला असल्याची माहितीउपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
मोहोळ तालुक्यात महसूल प्रशासनाने अवैध वाळू साठे व वाळू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत सुमारे 140ब्रास वाळू जप्त केली असून हा वाळू साठा मौजे पिरटाकळी ता.मोहोळ येथील जमीन गट.नं 15/2 येथे 100 ब्रास तर ग्रामपंचायत कार्यालय, देगांव ता.मोहोळ येथे 40 ब्रास वाळू साठा ठेवण्यात आला आहे. या ठिकाणच्या वाळू साठ्याची किंमत (अपसेट प्राईज) सुमारे 9 लाख 80 हजार रुपये इतकी आहे. ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यावावयाचा अशा व्यक्तींनी संबधीत ठिकाणच्या वाळू साठ्याची पाहणी करावी. तसेच दिनांक 19 मार्च 2018 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत लेखी अर्ज तहसिल कार्यालय मोहोळ यांच्याकडे सादर करावेत असेही उपविभागीय अधिकारी श्री ढोले यांनी सांगितले.
सदर लिलावात सर्वोत्तम बोलीची रक्कम लावलेल्या लिलावधारकाने संपूर्ण रक्कम तात्काळ त्याच दिवशी शासकीय खजिन्यात चलनाव्दारे जमा करावी. लिलावधारकाने लिलावाची रक्कम भरल्यानंतर स्वत:कडील वाहनाव्दारे संबधीत ठिकाणावरुन वाळू घेवून जावी. लिलावात भाग घेण्या-या व्यक्तींनी नमुद ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहनही उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments