पर्यावरणाच्या प्रश्नांवर वृक्षारोपण उत्तर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले : वृक्ष लागवड कार्यशाळा संपन्न

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 14 मार्च 2018


सोलापूर,– राज्याच्या वन विभागाने यंदा 13 कोटी वृक्षारोपणाचे लक्ष्य निश्चित केले आहे. या मोहिमेत प्रत्येक नागरिकाने भाग घ्यावा, वृक्षारोपण लोकचळवळ बनल्यास पर्यावरणाच्या प्रश्नांवर मात करता येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.
सोलापूर वनविभागातर्फे आयोजित वृक्षलागवड जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. भोसले बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, वन विभागाचे उपवनसंरक्षक संजय माळी, सहायक वनसंरक्षक हरिश्चंद्र वाघमोडे, सुवर्णा माने, आदी उपस्थित होते.
डॉ. भोसले म्हणाले, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाची वृक्ष लागवड योजना महत्त्वाची आहे. याला लोकचळवळीचे रुप देऊन जोमाने पुढे नेण्याची आवश्यकता आहे. केवळ वृक्ष लागवड न करता वृक्ष संवर्धन करण्याची आवश्यकता आहे.
डॉ. राजेंद्र भारूड यांनी गेल्या वर्षी पाच लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य असतानाही नऊ लाख वृक्ष लागवड केल्याबद्दल संजय माळी यांचे अभिनंदन केले. या वर्षीही जिल्ह्यास दिलेल्या उद्दीष्टापेक्षा जास्त वृक्ष लागवड करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
उपवनसंरक्षक संजय माळी यांनी वृक्ष लागवड उपक्रमाची विस्तृत माहिती दिली. वृक्ष लागवड महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. सोलापुरात केवळ दोन टक्के वनक्षेत्र आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी 33 टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्ह्याला सुमारे 16 लाख वृक्षलागवडीचे लक्ष्य दिले आहे. वनविभागाने त्यासाठी 27 लाख रोपे तयार ठेवली असून त्यापेक्षाही जास्त म्हणजेच 22 लाख वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक वृक्षाची ऑनलाईन माहिती शासनाला पाठवण्यात येईल. त्यासाठी जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे. तसेच ग्रीन आर्मीच्या माध्यमातून वृक्षारोपण उपक्रम चालवण्यात येणार आहे, असे श्री. माळी यांनी सांगितले.
दरम्यान, डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते जिल्हास्तरीय संत तुकाराम वनग्राम योजना पुरस्कार 2016-17 चे वितरण करण्यात आले. यामध्ये वनक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मेंढापूर (ता. पंढरपूर) यांना प्रथम क्रमांक, काळमवाडी (ता. माळशिरस) यांना द्वितीय तर बागलवाडी (ता. सांगोला) या गावाला तृतीय पुरस्कार देण्यात आला.
सूत्रसंचालन अपर्णा गव्हाणे यांनी केले. कार्यक्रमास पोलिस निरीक्षक रवि घोडके, सहायक वनसंरक्षक रमेश नागटिळक, वनपरिक्षेत्र अधिकारी निकेतन जाधव, आर. व्ही. कुलकर्णी आदी उपस्थित होते.
*****




पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments