लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 14 मार्च 2018
जिल्यातील ११ व्यक्तींना समाज भुषण पुरस्काराचे वितरण 
पंढरपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या वतीने पंढरपुर येथिल श्री संत सावता माळी मठात समाज भुषण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ११ व्यक्तींना समाजभुषण पुरस्कार देऊन सन्मानित केले असल्याचे माहिती ट्रस्टी डॉ. प्रभाकर माळी यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या सुरवातीस क्रांती सुर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्याला सकल माळी समाजाच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माळी समाज बांधवांनी जय ज्योती जय क्रांती अशा घोषणा दिल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सासवड येथिल माळी शुगर फॅक्टरीचे मॅनेजीग डायरेक्टर रजंणभाऊ गिरमे हे होते. दरम्यान संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.
महाराष्ट्र माळी समाज महासंघ यांच्या वतीने प्रथम वर्षीचे समाज भुषण पुरस्कार सांगोला-सोमनाथ आबासाहेब राऊत, मंगळवेढा-अशोक माळी, पंढरपुर- सुरेश टिकोरे, माळशिरस- सावता बोराटे, माढा- संभाजीराजे गोरे, करमाळा- आदीनाथ अंभग, बार्शी- सुरेश खरात, मोहोळ- लक्ष्मण भानवसे, उत्तर सोलापुर-विजय क्षिरसागर, दक्षिण सोलापुर- अविनाश गायकवाड, अक्कलकोट- यशवंत डोंगरीतोट आदी तालुक्यातीलमाळी समाजातील कार्यकर्त्यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपञक देऊन गौरवण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे ट्रस्टी डॉ. प्रभाकर माळी बोलताना म्हणाले, माळी समाजाचा प्रत्येक क्षेत्रात वावर असुन इतर समाजापेक्षा आपला समाज अजुन मागे आहे. याची कारणे अनेक असली मुख्य कारण शिक्षणाचा अभाव, वाढती व्यसनाधिनता, शेतकऱ्यांची दुरावस्था या गोष्टीकडे आपण लक्ष दिले पाहिजे. शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळाले पाहिजे.वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे, सर्व क्षेत्रात महिला पुढाकार घेत नाहीत. प्रत्येक क्षेत्रात महिलाचा सहभाग वाढला पाहिजे तरच महिलावरील अत्याचार कमी होण्यास मदत होईल असे मत. डॉ प्रभाकर माळी यांनी व्यक्त केले.
रणजंण भाऊ गिरमे बोलताना म्हणाले, आपल्या माळी समाज अजुन ही म्हणावी असी प्रगती झाली नाही. गेल्या अनेक वर्षापासून आपला समाज पुणे येथील फुले वाडा व भिडे वाडा हे राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी मोर्चा व आंदोलन करत आहे माञ अजूनही त्यांची दखल घेतली नाही. माळी समाजातील लढवय्ये नेते छगन भुजबळ यांच्या वर अद्याप आरोप सिद्ध झाले नाहीत तरी पण सरकार त्यांना जामीन मंजूर करीत नसल्याची खंत व्यक्त केली . आपण गप्प बसुन काहीही मिळणार नाही फोडा-फोडी केल्यावरच सरकारला जाग येईल असे मत गिरमे यांनी व्यक्त केले. यावेळी सोमनाथ राऊत, तुकाराम कुदळे, डॉ. विजयराव बोरावके, प्रा. मयुरी माळी आदींनी मनोगत व्यक्त केले.
या पुरस्कारासाठी डॉ. विजराव बोरावके, ट्रस्टी डॉ. प्रभाकर माळी, जयंत भंडारे, बाळासाहेब माळी,अॅड. भानुदास राऊत, माजी सभापती शिवाजी बनकर, शिवसेना प्रमुख मधुकर बनसोडे, अच्चुत फुले, जिल्हा अध्यक्ष तुकाराम कुदळे, माजी उपनगराध्यक्ष सुरेश माळी, विजय राऊत, मुन्ना अनंतकवळस आदीसह जिल्ह्यातील अनेक समाज बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा. निलकंठ लिंगे यांनी केले तर उपस्थिती मान्यवरांचे आभार अॅड. भारत बनकर यांनी मानले.
या पुरस्कारासाठी डॉ. विजराव बोरावके, ट्रस्टी डॉ. प्रभाकर माळी, जयंत भंडारे, बाळासाहेब माळी,अॅड. भानुदास राऊत, माजी सभापती शिवाजी बनकर, शिवसेना प्रमुख मधुकर बनसोडे, अच्चुत फुले, जिल्हा अध्यक्ष तुकाराम कुदळे, माजी उपनगराध्यक्ष सुरेश माळी, विजय राऊत, मुन्ना अनंतकवळस आदीसह जिल्ह्यातील अनेक समाज बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा. निलकंठ लिंगे यांनी केले तर उपस्थिती मान्यवरांचे आभार अॅड. भारत बनकर यांनी मानले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com



0 Comments