लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 28 मार्च 2018
पंढरपूर, दि. २७ (वार्ताहर) - कोलकाता येथे घेण्यात आलेल्या नॅशनल फोटोग्राफी स्पर्धेत पंढरपूरच्या राहूल गोडसे यांनी द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला आहे. या स्पर्धेमध्ये देशभरातील ३१ हजार फोटोग्राफर्स सहभागी झाले होते.
कोलकत्ता येथील फोटोरीब क्लबच्या वतीने दरवर्षी नॅशनल फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेमध्ये पंढरपूर तालुक्यातील टाकळी या गावातील राहूल गोडसे यांनी सहभाग घेतला होता. आषाढी वारी दरम्यान निघणाऱ्या पालखी सोहळ्यातील एक विकलांग वारकरी एका हाताने पखवाज वाजवीत असल्याचा अफलातून फोटो गोडसे यांनी टिपला होता.
या फोटोला द्वितीय क्रमांक मिळाला. स्पर्धेत पारितोषिक मिळालेल्या आणि नामांकन मिळालेल्या उत्कृष्ट छायाचित्रांचे प्रदर्शन कोलकत्ता येथील गॅलरी गोल्ड मध्ये 23 मार्च ते 25 मार्च 2018 दरम्यान भरविण्यात आले होते.
राहूल गोडसे यांच्या या कलाकृतीमुळे पंढरपूरची वारी आणि पालखी सोहळा राज्याबाहेर पोहचला असून पंढरपूर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा या निमित्ताने रोवला गेला आहे. गोडसे यांना मिळालेल्या पुरस्काराचे आणि त्यांच्या फोटोग्राफीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments