मेहनत केली तर खेड्यात राहूनही गुणवंत व्हाल- अ‍ॅड. अजित देशमुख

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!


पंढरपूर LIVE 28 मार्च 2018

- कुर्ला येथे गुणवंतांचा सत्कार

             बीड ( प्रतिनिधी ) चांगल्या दर्जाचं शिक्षण घ्यायला शहरातच जावं लागतं अस नाही. विद्यार्थ्यांच्या अंगी मेहनत घेण्याची जिद्द असेल तर तो खेड्यात राहूनही गुणवंत होऊ शकतो. विद्यार्थी अभ्यासू असला की, पालकाचा शिक्षणावरचा खर्च आपोआप कमी होतो. त्यामुळे विशेष करून ग्रामीण विद्यार्थ्याने कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात. भ्रष्ट प्रशासन कॉपी रोखू शकत नाही. म्हणून विद्यार्थ्यांनो तुम्हीच कॉपी करू नका आणि गुणवंत व्हा, असा सल्ला जन आंदोलनाचे विश्वस्त अ‍ॅड. अजित एम. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना दिला.
              देशमुख कुर्ला येथील तुषार पाटील सर संचलित ' यश कोचिंग क्लासेस ' च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि निरोप समारंभ कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुर्ला, ता. बीड चे माजी मुख्याध्यापक श्री. मुळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गोवर्धन मस्के सर, रामेश्वर मोरे सर, श्रीराम गुंड सर हे हजर होते. यावेळी अनेक पालकही हजर होते.
           अँड. देशमुख पुढे म्हणाले की. सध्या शहरात कोचिंग क्लासेस मोठ्या प्रमाणात चालतात. म्हणून ग्रामीण विद्यार्थ्याने शहरात यावे असे नाही. ग्रामीण पालक शेती पिकत नसल्याने हतबल होतात. अशा परिस्थिती इथल्या शिक्षकांची जबाबदारी वाढते. त्यामुळे शिक्षकांनी आपले कर्तव्य पूर्ण करणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांचा पाया मजबुत झाला तरच ग्रामीण विद्यार्थी उभा राहू शकतो. विद्यार्थ्यांनीही मन लावून अभ्यास करणे गरजेचे आहे, असे ही देशमुख म्हणाले.
           माजी मुख्याध्यापक आणि सध्या केज येथे शिक्षण विस्तार अधिकारी मुळे सर म्हणाले की, मी या गावात नौकरी करताना लोक सहभागातून शाळेचे विकासकामं केले. शाळा सुंदर केली. गुणवत्ता वाढविण्यासाठी कसोशीने प्रयत्नही केले. ग्रामीण विद्यार्थ्यांची आकलन शक्ती उत्तम असते. मात्र त्याला अभ्यासाची जोड असणे गरजेचे असते. त्यासाठी पालकांनी लक्ष देण्याची गरज असते.
             गोवर्धन मस्के सर तसेच पवार सर यांनीही विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन केले. काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनीही मनोगत व्यक्त केले. तुषार पाटील यांनी ग्रामीण भागात क्लासेस चालवून विदयार्थी घडविण्यासाठी कसे प्रयत्न होत आहेत हे सांगीतले. ग्राम पातळीवर पालकांच्या अडचणी मोठ्या असतात. त्यातून मार्ग काढत विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हंटले.
             यश कोचिंग क्लासेसने घेतलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना तसेच दहावीच्या गुणवंत विद्याथ्यांना बक्षिस वाटप केले. बक्षीस रुपाने विद्यार्थ्यांना पुस्तक देऊन त्यांच्यातील वाचनाची आवड वाढविण्याचा प्रयत्न क्लासेसने केला. ग्रामीण भागात हे चांगला प्रयत्न होत असल्याने पालक वर्ग समाधानी आहे.
           कार्यक्रमाचे सूत्र संचालन सीमा शेख आणि वैभवी कुटे या दोन विद्यार्थिनींनी केले. आभार प्रदर्शन श्रीराम गुंड सर यांनी केले.








पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments