जिरेवाडीची जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था :सिईओ साहेब जिरेवाडीकडे लक्ष घालणार का ?

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 30 मार्च 2018
बीड:-बीड शहरापासून जवळच असलेल्या जिरेवाडी येथे पहीली ते सातवी पर्यत जिल्हा परिषद शाळा आहे व येथे विद्यार्थ्यासाठी चार जिल्हापरिषद शाळेच्या खोल्या आहेत परंतू चार पैकी एका शाळेच्या खोलीची गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून दुरावस्था झाली आहे त्यामुळे बीड जिल्हा परिषद चे सिईओ जिरेवाडीकडे लक्ष घालणार का ? असा सवाल जिरेवाडी ग्रामस्थातून होत आहे.

याबाबत अधिक माहीती अशी कि,शहरापासून जवळच असणार्या जिरेवाडी येथील तीस ते पसतीस वर्षापुर्वी बांधण्यात आलेल्या जिल्हापरिषद शाळेच्या खोलीची अत्यंत दुरावस्था झाली असून शाळेच्या भिंतीला चार ही बाजूकडून तडे गेले आहेत व शाळेचे पञे झिजली आहेत त्यामुळे विद्यार्थ्याच्या आणि शाळेजवळून येणार्या जाणार्या ग्रामस्थाच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे कारण वेळीच पडझडीस झालेल्या शाळेची खोली नाही पाडल्यास मोठा अनर्थ घडू शकतो त्यामुळे बीड जिल्हा परिषदचे सिईओ जिरेवाडीकडे लक्ष घालणार का ?असा सवाल उपस्थित होत आहे कारण जिल्हा परिषद सिईओ यांनी जिरेवाडी कडे वेळीच लक्ष घालून पडझड झालेल्या शाळेची पहाणी करून पडझड झालेली शाळा पाडण्याचे संबधित विभागाला आदेश द्यावेत अशी मागणी जिरेवाडी ग्रामस्थ करित आहेत व तसेच पडझडीस आलेल्या शाळेचा वापर सरपन व ईतर साहीत्या ठेवण्यासाठी वापर केला जात आहे 

शाळा पाडण्यासाठी ग्रामसेवकाकडे तक्रार करून ही दुर्लक्ष
गावातील तीस ते पस्तीस वर्षापुर्वीच्या जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झाली आहे आणि वेळीच ही जिल्हा परिषद शाळा नाही पाडल्यास विद्यार्थ्याच्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो आणि तसेच  शाळेजवळून येणार्या जाणार्या ग्रामस्थाना ही धोका होऊ शकतो त्यामुळे गावातील काही नागरीकानी ग्रामसेवक ग्रां,प,कार्यालय जिरेवाडी यांच्याकडे शाळा पाडण्यासाठी लेखी स्वरूपात अर्ज करून देखील जिरेवाडी ग्रामसेवकाकडून दुर्लक्ष झाल्याची चर्चा गावात सुरू आहे   









पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments