लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 29 मार्च 2018
गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यातील खांडवी येथे आज सकाळ पासूनच अण्णा हजारे यांना पाठिंबा देण्यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थांनी धरणे आंदोलन चालू केले आहे. अण्णा हजारे यांचे आंदोलन चालू असून जनतेच्या मागण्या त्यातून अण्णांनी सरकारपुढे ठेवल्या आहेत. मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील सामाजीक कार्यकर्ते अशोक ज्ञानोबा जंगले यांनी यावेळी बोलताना केला आहे.
शेतकरी आणि तमाम जनता सध्या वेगवेगळ्या कारणाने पिळली जात आहे. असे असताना सरकार अण्णांनी मांडलेल्या जनहिताच्या मागण्या मान्य करायला विनाकारण वेळ लावत आहे. त्यामुळे आता आंदोलन अजून तीव्र करण्याचा विचार करावा लागेल, असेही ग्रामस्थांनी म्हंटले आहे.
राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतीमालाला भाव मिळत नाही. शेतकऱ्याचा माल बेभाव विकावा लागतो. त्यामुळे शेतकरी हतबल होतो आणि माल व्यापाऱ्यांकडे गेला की, भाव वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळाला पाहीजे. म्हणून अण्णांनी केलेली स्वामिनाथन आयोग लागू करण्याची मागणी मान्य झालीच पाहिजे.
देशाला भ्रष्टाचाराने खाऊन टाकले आहे. घोटाळे कमी होण्याऐवजी वाढत आहेत. घोटाळे बहाद्दर जेलमध्ये जावेत. ही सर्व सामान्यांची मागणी आहे. म्हणून लोकपाल आणि लोक आयुक्त आलाच पाहिजे.
या आंदोलनात अशोक ज्ञानोबा जंगले, अशोक नाईकवाडे, रणजित अण्णा शिंदे, गणेश जंगले, दीपक लोंढे, शाम गायकवाड, अमित नाईकवाडे, सिद्धु सोनवणे, अविनाश सुरवसे यांच्यासह अनेक शेतकरी आणि ग्रामस्थ हजर होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments