पंढरपूर लाईव्हच्या सर्व वाचकांना व जाहिरातदार बंधु-भगिणींना गुढी पाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 17 मार्च 2018
केंद्र शासनाचे प्रस्तावित नॅशनल मेडिकल कमिशन हे डॉक्टरसह समाजाच्या देखील फायद्याचे नसल्याने या कमिशनला विरोध असल्याचे आय. एम. ए. चे प्रदेशाध्यक्ष डॉ. वाय. एन. देशपांडे यांनी सांगितले. पंढरपूर येथे आय.एम.ए. या संघटनेच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदे दरम्यान डॉ. वाय. एन. देशपांडे बोलत होते. यावेळी डॉ. संतोष खडतरे, डॉ. संतोष कुलकर्णी, डॉ. प्रकाश मराठे, डॉ. ज्योती चीडगुपकर, डॉ. पंकज गायकवाड, डॉ. मंदार सोनवणे, डॉ. धीरज पाटील डॉ. वर्षा काणे व पंढरीतील अनेक डॉक्टर उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या प्रस्तावित मेडीकल कमिशननुसार वैद्यकीय कॉलेजवर पुढे शासनाचे बंधन नसणार आहे. ते अधिकार व्यवस्थापन समितीकडे दिले जाणार आहेत. यामुळे वैद्यकीय शिक्षणामध्ये मनमानी कारभार चालणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना जादा फी आकरणी होऊ शकते. यामुळे कदाचित भष्ट्राचाराला प्रोत्साहन देखील मिळणार आहे. भारतातील नागरीकांने विदेशात वैद्यकीय शिक्षण घेतले व तो भारतात परत आल्यातर त्याचे वैद्यकीय शिक्षण ग्राह्य धरले जात नाही. त्याला पुन्हा भारतामध्ये वैद्यकीय शिक्षण घ्यावे लागणार आहे. त्याचबरोबर कुठल्याही पॅथीला इतर डॉक्टरकडे दोन वर्ष सराव केल्यास अॅलोपॅथी करायची परवानगी मिळणार आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments