पंढरपूर लाईव्हच्या सर्व वाचकांना व जाहिरातदार बंधु-भगिणींना गुढी पाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 17 मार्च 2018
पंढरपूर: “ सत्याप्पा, महात्मा फुले, शाहूमहाराज आणि आई-वडिलांच्या
व्यक्तिमत्वाचा प्रभाव कर्मवीर अण्णांच्या जीवनावर पडला होता. कर्मवीर अण्णांनी
सर्व जाती धर्मातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांचे कैवारी म्हणून
आयुष्यभर काम केले. गोरगरिबांच्या मुलांसाठी दऱ्या-खोऱ्यात अनवाणी फिरले.
लक्ष्मीबाई रूढी परंपरा पाळणाऱ्या होत्या, अण्णांच्या सहवासात आल्यानंतर
त्यांच्या विचारात परिवर्तन झाले. लक्ष्मीबाईच्या अश्रूमुळेच कर्मवीर अण्णांनी रयत
शिक्षण संस्थेची स्थापना केली.आत्मभान असणारा माणूस निर्माण करण्याचे काम
रयत शिक्षण संस्थेने केले आहे. रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष बहरण्यामध्ये
रयतमाऊली सौ. लक्ष्मीबाई पाटील व कर्मवीर अण्णा यांचा त्याग आहे. ” असे
प्रतिपादन सोलापूर येथील पंचरंग प्रबोधिनीचे संपादक प्रा. डॉ. रावसाहेब पाटील
यांनी केले.
पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील
महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या वतीने रयतमाऊली सौ. लक्ष्मीबाई
भाऊराव पाटील पुण्यतिथी समारंभ साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे
म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य सीताराम गोसावी
होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य गोसावी म्हणाले ‘रयतमाऊली सौ.
लक्ष्मीबाई आणि कर्मवीर अण्णा यांचा त्यागावर रयत शिक्षण संस्था बहरली. ते
त्यागी जीवन त्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्ती जगताना दिसतात.’ यावेळी
व्यासपीठावर मा. प्राचार्य सीताराम गोसावी, कलाविभागाचे उपप्राचार्य प्रा. बी.
जे. तोडकरी, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य एन. एन. तंटक, विज्ञान विभागाचे
उपप्राचार्य डॉ. जे. एस. पाटील, जनरल बॉडी सदस्य डॉ. राजेंद्र जाधव, मा.
बाळासाहेब पाटील, सांस्कृतिक विभागाचे चेअरमन डॉ. विकास कदम, समारंभ
समिती प्रमुख डॉ. हणमंत लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते
पी. एचडी. मार्गदर्शक म्हणून निवड झाल्या बद्दल डॉ. एस. पी. शिंदे, डॉ. एच. एम.
लोंढे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. रावसाहेब पाटील यांनी
दिग्दर्शित कर्मवीरांच्या जीवनावर लघुपट दाखविण्यात आला. स्वागत, प्रास्ताविक
व पाहुण्याचा परिचय डॉ. विकास कदम यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. आर.
एस. पवार यांनी केले. आभार डॉ.लोंढे यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील
शिक्षक- शिक्षेकेतर सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments