सायबर गुन्हे देशापुढील नवीन आव्हान! तहसीलदार बर्गे

पंढरपूर लाईव्हच्या सर्व वाचकांना व जाहिरातदार बंधु-भगिणींना गुढी पाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 17 मार्च 2018


जिल्हास्तरीय ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी स्मृती पुरस्काराचे वितरण.

पंढरपूर (प्रतिनिधी) : देशातील अर्थ व्यवस्था काळाच्या ओघात बदलत असून त्यामध्ये डीजीटल आणि कॅशलेस प्रणालीचा
वापर वाढला आहे परंतु त्याचवेळी त्याच्या अनुषंगाने घडणारे सायबर गुन्हे हे देशापुढील आव्हान होत असून त्यावर मात
करण्यासाठी ग्राहकांनी सजगपणे डीजीटल आणि कॅशलेस प्रणालीचा वापर केला तर सायबर गुन्ह्यांना नक्कीच आळा बसेल असा
विश्वास पंढरपुरचे तहसीलदार श्री. मधुसूदन बर्गे यांनी, तहसील कार्यालय पंढरपूर आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्यावतीने
सांस्कृतिक भवन उपविभागीय कार्यालय येथे जागतिक ग्राहक हक्क संरक्षण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.
या वेळी व्यासपीठावर तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका कृषी अधिकारी श्री. कौलगे, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे
महासचिव प्र. वि. कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश फडे, शहराध्यक्ष दिनेश खंडेलवाल, अ.भा.ग्रा.पं. चे प्रांतिक कार्यकारिणी सदस्य
सुभाष सरदेशमुख, शहराध्यक्ष अण्णा ऐतवाडकर आणि जिल्हास्तरीय ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशीस्मृती पुरस्कारप्राप्त श्री. संजय
शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, भारतच्या अर्थशास्त्रातील महत्वाचा घटक ग्राहक असून त्याच्या शोषण मुक्तीसाठी
शासन कटिबद्ध आहे. शेतकरी ग्राहकांनी फसवणूक होऊ नये म्हणून प्रत्येक व्यवहार पावतीसह करावा भविष्यात नुकसान भरपाई
मागण्यासाठी त्याच्या उपयोग होऊ शकतो. भारतातील सर्व ग्राहकांना बिंदुमाधव जोशी यांच्यामुळेच ग्राहक संरक्षण कायद्याची
कवच कुंडले मिळाली असेही त्यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी ग्राहकाच्या सामान्य समस्यांवर सुभाष सरदेशमुख यांनी मार्गदर्शन
केले. तर ग्राहकतीर्थ बिंदूमाधव जोशी स्मृती पुरस्काराचे प्रयोजन प्र. वि. कुलकर्णी यांनी केले. या प्रसंगी जागतिक ग्राहक हक्क संरक्षण
दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या पंढरपूर शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयात घेण्यात आलेल्या वक्तृत्व
स्पर्धामधील गुणवत्ता प्राप्त १२ विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यात
सामाजिक आणि ग्राहकहितासाठी कार्य करणाऱ्या समाजशरण व्यक्तीस दिला जाणारा जिल्हास्तरीय ग्राहकतीर्थ बिंदूमाधव जोशी
स्मृती पुरस्काराचे वितरण तहसीलदार श्री. बर्गे यांच्या हस्ते श्री. संजय शांतीलाल शहा यांना करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत अण्णा ऐतवाडकर यांनी प्रास्ताविक अॅड सौ. श्रद्धा बहिरट यांनी केले, कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन दीपक इरकल यांनी आणि आभार प्रदर्शन प्रा. गुरुनाथ बहिरट यांनी केले. यावेळी प्रांत कार्यालयातील श्री. पवार साहेब,
अन्न व औषध प्रशासनाचे शेटे साहेब, सहाय्यक निबंधक श्री. घुगे, पंचायत समितीतील श्री. पवार साहेब यांच्यासह शासनाच्या
विविध कार्यालयाचे प्रतिनिधी आणि सोलापूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य नंदकुमार देशपांडे, जगन्नाथ राजमाने, वर्षा
गायकवाड, ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे पांडुरंग बापट, विजय सामंत, विजय वरपे, श्रीनिवास खाबाणी, चिंतामणी दामोदरे, मिलिंद
वाईकर, सागर रणदिवे, महेश व्यास अ.भा.ग्रा. पंचायतचे शशिकांत हरिदास, विनोद भरते, विनय उपाध्ये, सुहास निकते, संजय
खंडेलवाल यांच्यासह विद्यार्थी / पालक आणि ग्राहक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता पुरवठा निरीक्षक जी. के.
व्हनकडे, ले.अ.का. एन. व्ही. खंकाळ, ले. अ.का. ए. एम.शहापुरे यांच्यासह तहसील कार्यालातील कर्मचाऱ्यांनी नियोजन केले.













पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments