लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!


पंढरपूर LIVE 22 मार्च 2018

पंढरपूर : विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्यावतीने विविध क्षेत्रात काम करणाºया २५ मान्यवरांना व ५ संघटनांना  पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शहीद जवान रमेश ज्ञानेश्वर देवकर यांच्या कुटुंबीयांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डि.राज सर्वगोड यांनी दिली.
विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या मान्यवरांनी आपले प्रस्ताव फोटोसह ५ एप्रिल पर्यंत शिवाजी चौकातील सुरवसे बिल्डींग मधील राजाफोटो स्टुडीओ मध्ये देण्यात यावा.  अन्यथा ९४२३३३५१००, ९७६३८२७४४७, ९९७५३४६५२७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे अवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.
यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव अनिल ननवरे, जयंती समिती अध्यक्ष विशाल आर्वे, विणा तिरपुडे, आनंद कुलकर्णी, समाधान करंडे, अजिंक्य देवमारे, संघराज इंगळे, अफसाना शेख, संतोष बंडगर, जमीर तांबोळी, राबीया शेख, सुलभा कुलकर्णी, सोहन जैस्वाल, आण्णा सलगर, लखन वाघमारे, आकाश फडतरे, मंगल रेड्डी, आदम बागवान, सुरेश नवले, दिपक नाईकनवरे उपस्थित होते.

या नावाने देणार पूरस्कार
प्रबुध्द विधिज्ञ,महर्षी वाल्मीकी शौर्यरत्न, वर्धमान महावीर अहिंसा रत्न,राष्टÑसंत रोहिदास महाराज, प्रबोधनरत्न,छत्रपती शिवाजी महाराज प्रशासन रत्न,राजमाता अहिलादेवी होळकर उद्योगरत्न, महात्मा बसवेश्वर समाज भुषण, क्रांती ज्योती सावित्री फुले शिक्षण भुषण, राष्टÑसंत गाडगे महाराज शिक्षण रत्न, नारायण मेघाजी लोखंडे कामगार रत्न,डॉ. सी. के. बोले वैद्यकीय रत्न, राजर्षी शाहु महाराज क्रिडा रत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेष्ठ पत्रकार (प्रिन्ट व इलेक्ट्रॉन्किस मेडीया), आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर युवा पत्रकार (प्रिन्ट व इलेक्ट्रॉन्किस मेडीया), साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे साहित्य रत्न, महाकवी वामनदादा कर्डक कलारत्न, डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न, भारतरत्न मोक्षगुंडम सर विश्वेश्वरय्या स्थापत्यरत्न, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, विज्ञानरत्न,मॉ जिजाऊ  आदर्श माता पुरस्कार, माता रमाई आदर्श पत्नी पुरस्कार, वीर शिवा काशीद वीररत्न पुरस्कार, राष्टÑपिता महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार












पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे