लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 22 मार्च 2018
ऐन गुढी पाडव्याच्या दिवशीच पंढरीतील अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांचे हत्याकांड घडले. या हत्याकांडातील आरोपींच्या शोधार्थ पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आत्तापर्यंत 4 आरोपींना ठाण्यातून अटक केली होती. ठाण्यातून दोन आरोपी पळून गेले आहेत. आत्ता पंढरीतील अन्य तीन आरोपींना पोलिसांनी अटक केलीय. त्यामुळे या हत्याकांडात सहभागी असणार्या एकुण नऊ आरोपींची नांवे आत्तापर्यंत उघडकीस आली आहेत. सात आरोपी गजाआड असून अन्य दोघांचा शोध सुरु आहे.
ठाणे पोलिसांनी अक्षय उर्फ बबलु धनंजय सुरवसे, पुंडलिक शंकर वनारे (33), मनोज शंकर शिरशीकर (32), भक्तराज ज्ञानेश्वर धुमाळ (26) माजीवडा परिसरात सापळा रचून अटक केली होती. त्या आरोपींना पंढरपुरात आणण्याची प्रक्रिया सुरू असतानाच सोलापूर गुन्हे अन्वेषण शाखेने पंढरीतील आणखी 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे. सचिन भगवान वाघमारे , आकाश हणुमंत बुराडे, रुपेश उर्फ लल्या दशरथ सुरवसे अशी नुकतीच अटक झालेल्या पंढरीतील आरोपींची नांवे आहेत. या तिघांनी संदीप पवार यांच्यावर पाळत ठेवून त्यांचे लोकेशन दिल्याचे तपासात निष्पन्न झाले असून कट रचणारे म्हणून त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती पंढरपूरचे डी.वाय.एस.पी. निखील पिंगळे यांनी पंढरपूर लाईव्हला दिली आहे.
संदीप अधटराव, विकास उर्फ विकी मोरे या ठाण्यातून पळून गेलेल्या दोन आरोपींचा पोलिस कसून शोध घेत आहेत.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments