शहरातील खुल्या जागा व रस्त्यांवर वाढलेल्या काटरी झाड-झुडपे त्वरीत काढा – आमदार प्रशांतराव परिचारक

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 16 मार्च 2018

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने इसबावी भागात असलेल्या मलपे ओढा येथे मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे वाढल्याने तेथील नागरीकांच्या येणा-या तक्रारी विचारात घेवुन ती काटेरी झुडपे काढण्याचा शुभारंभ आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते, उपनगराध्यक्ष विशाल मलपे यांच्या अध्यक्षतेखाली, गटनेते गुरुदास अभ्यंकर, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगरसेवक गणेश अधटराव, नगरसेवक प्रशांत शिंदे, विवेक परदेशी, नरसिंह शिंगण, सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे, नवनाथ रानगट, धर्मराज घोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी शिवकिर्ती नगर मधील डॉ.आहेर, डॉ.दिक्षीत यांनी त्या भागातील अडचणी सांगुन त्या भागात ड्रनेज, रोडलाईटची व्यवस्था व्हावी अशी मागणी केली.

 तसेच त्या भागात असणारी लेआऊटमधील खुली जागा विकसीत करण्याची परवानगी मागितली. यावेळी बोलताना आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की, शासन स्तरावर पाठपुरावा करुन मा.मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, नगरविकास मंत्री रणजित पाटील व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातुन भुयारी गटार योजनेसाठी शासनाकडुन सुमारे ६० लाख रुपयांची तिस-या टप्प्याची योजना मंजुर करुन आणलेली आहे. तसेच इसबावीच्या उत्तर भागातील लोकांसाठी पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी १० लाख लिटरची पाण्याची टाकी मंजुर करण्यात आली असुन लवकरच ही कामे पुर्ण होतील व आपल्या भागातील पाण्याचा व भुयारी गटारींचा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन दिले. तसेच मलपे ओढा येथील काटेरी झुडपे काढल्यामुळे सदरचा ओढा रिकामा होणार आहे व या ओढ्यामध्ये या झाडांमुळे साठणारे पाणी जलद गतीने पुढे गेल्याने सांपांचे व डासांची प्रमाण कमी होवुन दुर्गंधीही कमी होणार आहे.

सदरचा ओढ्यामधील गाळ काढुन त्या ओढ्याची खोली व रुंदीकरण करावे तसेच शहरातील कासेगाव रोड, गणेश नगर, मनिषा नगर, लिंक रोड, कोर्टी रोड या भागात सुद्धा काटेरी झुडपांचे प्रमाण वाढलेले असुन या काटेरी झुडपांमुळे रस्त्याच्या रहदारीस अडथळा निर्माण होत आहे व ज्या खाजगी प्लॉट किंवा ओपन स्पेसमधील काटेरी झुडपांमुळे तेथे राहणा-या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी नगरपरिषदेमार्फत शहरातील सर्वच भागातील काटेरी झुडपे काढण्याचे स्वतंत्र अभियान राबवावे व नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले यांच्या माध्यमातुन नागरीकांनाही याबाबतचे जाहिर आवाहन प्रसिद्धीच्या माध्यमातुन करावे अशी सुचना यावेळी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली. यावेळी नगरपरिषदेच उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकर, तसेच या भागातील नागरीक नरसिंह पुजारी, विश्वंभर पाटील, गणेश मलपे, शार्दुल नलबिलवार, विलास भोसले, डॉ.आहेर, डॉ.दिक्षीत, चोरमुले सर व शिवकिर्ती नगर मधील नागरीक मोठ्या संख्येने हजर होते. 












पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments